Heat Wave  Pudhari
सोलापूर

Solapur heat wave: तप्त उन्हाने नागरिक हैराण, सोलापूरचा पारा 39 अंशांकडे!

मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात सूर्यनारायणाने आग ओकण्यास सुरुवात केली आहे

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात सूर्यनारायणाने आग ओकण्यास सुरुवात केली आहे. सोलापुरातील तापमानाचा पारा 39 अंशांकडे वाटचाल करत असून, तप्त उन्हामुळे सोलापूरकर घामाघूम झाले आहेत.

यंदाच्या वर्षी फेब्रुवारी महिना संपताच तापमानात सातत्याने वाढ आहे. गुरुवार, दि. 5 मार्च रोजी सोलापूर शहरात हंगामातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली असून, उन्हाचा पारा आता थेट 38.8 अंशांच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. यामुळे मार्चच्या पहिल्या पाच दिवसांतच सोलापूरकरांना कडक उन्हाचा सामना करावा लागत आहे. सोलापूरचे कमाल तापमान 38.8 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 20.7 अंश सेल्सिअस तर हवेतील आर्द्रता 29 टक्के नोंदला आहे. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता अधिक असल्याने दुपारच्या वेळी वर्दळीचे रस्ते ओस पडू लागले आहेत. हवेतील आर्द्रता 29 टक्क्यांपर्यंत खाली आल्याने कोरड्या उन्हाचा तडाखा अधिक जाणवत आहे.

दुसरीकडे मधला मारुती, कुंभार वेस, साखर पेठसह शहरातील अन्य काही भागात दुकानदारांनी उन्हापासून बचाव करण्यासाठी दुकानांसमोर शेडनेटचे कापड मारुन उन्हापासून सुटका करत आहेत. तर जिल्हा परिषद, सिध्देश्वर प्रशाला, सात रस्ता, अक्कलकोट रोड, विजयपूर रोडसह दूध डेअरी येथे लस्सी, मठा, ताक विक्री करण्यासाठी विक्रेत्यांची गर्दी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT