सोलापूर : यंदाच्या हंगामात तापमानाने सर्वोच्चय पातळी गाठल्यानंतर मागील चार दिवसांत पारा 5.4 अंशानी घट झाला असून, तापमान घटूनही धग कायम असून, नागरिक उकाड्याने त्रस्त आहेत. दरम्यान बुधवारी महावितरणाने विज दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने विजेचा लपंडाव पाहायला मिळाला.17 एप्रिल रोजी 44 अंश सेल्सिअस इतका उच्चांकी तापनानाचा नोंद झाला.
त्यानंतर तापमान उतरण्यास सुरुवात झाली असून, 20 मे रोजी 38.6 अंश सेल्सिअस इतका तापमान नोंदला गेला. गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात बदल होत आहे. शहरासह ग्रामीण भागांत काही वाळवाचा हलक्या सरी कोसळल्या आहेत. बुधवारी सकाळी आभाळ भरून पावसाळी वातावरण तयार झाले होते. त्यानंतर पुन्हा सकाळी 10 वाजलेपासून सुर्यनारायण बाहेर पडले. दिवसभर ढगाआडून तप्त उन्हाची झळे वाहत होती.
हवामान विभागाने पुढील आठवडाभर पावसाबरोबरच उष्णतेच्या झळा वाहणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे.