Temperature  Pudhari
सोलापूर

Solapur temperature: सोलापूर 44 अंश सेल्सिअसवर

एप्रिल महिन्यातील 27 पैकी 17 दिवस तापमान 40 अंशांवर

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : जिल्ह्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस तीव्र होत असून, सोमवारी (दि. 27) कमाल तापमानाने 43.9 सेल्सिअसचा टप्पा गाठला. यंदाच्या मोसमातील हे उच्चांकी तापमान ठरले. वाढत्या उष्णतेमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार उष्णतेची लाट सोलापूर शहर, जिल्ह्यात दिसून आली. पुढील काही दिवस अशीच लाट वाहणार असल्याची शक्यता आहे.

यंदा 1 ते 27 एप्रिल या काळात 17 दिवस तापमान हे 40 अंशांवर राहिले आहे. त्यामुळे यंदाचा एप्रिल महिना हा सर्वाधिक हॉट राहिला आहे. हवेतील कोरडेपणा वाढल्याने उकाडा आणि उष्णतेच्या तीव्र झळा आहेत. तापमानाचा पारा चढाच राहिल्यामुळे नागरिक हैराण झालेत. तो 40 अंश सेल्सिअसवर राहिला आहे.

उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे डांबरी रस्ते, सिमेंट रस्ते, सिमेंट आणि पत्र्याची घरे ही गरम होऊन नागरिकांना उष्णतेच्या झळा सहन कराव्या लागल्या. यातच भर म्हणून शहरातील काही भागांत विजेचा लपंडाव पाहायला मिळाला. हवामान विभागाने सोलापूरसह मध्य महाराष्ट्रात तापमानाचा आलेख 19 एप्रिलपर्यंत चढता राहण्याची शक्यता वर्तवली आहे. उष्माघात टाळण्यासाठी नागरिकांनी दर अर्ध्या तासाला पाणी प्यावे, लिंबू सरबत, ताक यांसारख्या पेयांचा आहारात समावेश करावा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT