Temperature  Pudhari
सोलापूर

Solapur temperature: तापमानाचा पारा कायम; 42.4 अंश तापमानाची नोंद

आजपासून तीन दिवस अवकाळीची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : सोलापूर शहर परिसरात शनिवारी ऊन, सावलीचा लपंडाव सुरु असला तरी तापमानात किंचित 0.2 अंशानी वाढ होत 42.4 अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदले गेले. तापमानाचा पारा कायम राहिल्याने वातावरणात कोरडेपणा वाढून उकाडा वाढला आहे. तर उन्हाच्या तप्त झळाही वाहत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.

यंदाच्यावर्षी मार्च महिन्याच्या पंधरवडापासूनच तापमानात सातत्याने वाढ झाली. तर एप्रिल महिन्यात सर्वोच्च तापमानाची नोंद झाल्याने सोलापूरकरांसाठी हा उन्हाळा तापदायक ठरत आहे. हवामान विभागाने उष्णतेच्या झळाबरोबरच वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता वर्तविली आहे. सोलापूरसह पश्चिम महाराष्ट्रात 19 ते 22 एप्रिल दरम्यान दुपारनंतर काही प्रमाणात ढगाळ हवामान आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या कालावधीत विजांचा कडकडाट, पाऊस तसेच काही ठिकाणी गारपीटीची शक्यता आहे.

सध्याच्या हवामान अंदाजानुसार 19 एप्रिल रोजी काही भागांमध्ये दुपारनंतर वादळी पावसाची शक्यता आहे. त्यानंतर 20 आणि 21 एप्रिल रोजी पावसाचे क्षेत्र वाढण्याचे संकेत आहेत. 22 तारखेला वादळी पावसाचे क्षेत्र आणि त्याच्या तीव्रतेत घट होईल. शेतकऱ्यांनी शेतीची कामे हवामानानुसार नियोजित करावीत. काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवावीत किंवा ताडपत्री, झाकणाने सुरक्षित ठेवावीत. गारपीटीपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अशा सूचना कृषी विभागाने दिल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT