सोलापूर : शासकीय व अनुदानित मागासवर्गीय विद्यार्थी वसतिगृहासाठी अनुसूचित जाती आणि नवबौद्ध या समाज घटकातील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला नाही. अशा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी सामाजिक न्याय विभाग डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबवते. यातून विद्यार्थ्यांना आर्थिक मदत दिली जाते. या योजने पात्र असलेल्या जिल्ह्यातील 1056 विद्यार्थ्यांना चार कोटी 78 लाख रूपये त्याच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत.
या योजनेतून निर्वाह, भोजन भत्ता व शैक्षणिक मदतीसाठी अनुदान दिले जाते. सामाजिक न्याय विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी 1242 विद्यार्थ्यांनी प्रस्ताव सादर केला होता. यातील 1056 पात्र विद्यार्थ्यांना लाभ मिळाला आहे. 2025-26 या आर्थिक वर्षासाठी स्वाधार योजनेकरिता शासनाकडे चार कोटी 78 लाख 40 हजार रूपये निधीची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी तीन कोटी 89 लाख 25 हजार रूपये विद्यार्थ्यांच्या खात्यात यापूर्वी जमा करण्यात आले. अद्याप 78 लाख 74 हजार रूपये विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
प्राप्त झालेले चार कोटी 78 लाख 40 हजार रूपये 1056 विद्यार्थ्यांच्या खात्यात पहिल्या टप्प्यातील रक्कम जमा करण्यात आली आहे.