सोलापूर

Sushilkumar Shinde | देशातील वातावरण बदलले : सुशीलकुमार शिंदे

जे बारा वर्षांपूर्वी देशात वातावरण होते, ते आता पूर्णपणे बदलल्‍याचे भाष्य माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : लोकशाहीत संवाद महत्त्वाचा आहे. सरकारने विरोधकांना समजावून घेतलं पाहिजे, मात्र, सरकार विरोधकांकडे दुर्लक्ष करत असून, जे बारा वर्षांपूर्वी देशात वातावरण होते, ते आता पूर्णपणे बदलल्‍याचे भाष्य माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले.

पाध्ये स्‍मृती राज्‍यस्‍तरीय पुरस्‍कार वितरण समारंभानंतर शिंदे यांनी शुक्रवारी (दि.२३) पत्रकारांशी संवाद साधला. त्‍यांनी देशातील वातावरण बदलल्‍याचे भाष्य केले. ते म्‍हणाले, पत्रकारांनी एकांगी विचार न मांडता प्रत्यक्ष ग्राउंडवरील कामाचे वास्तव जनतेसमोर आणले पाहिजे. १२ वर्षांपूर्वी देशात जे वातावरण होते, त्यात आता बदल झाला आहे. लोकशाही जिवंत ठेवली पाहिजे. त्यात कोणतीही विघ्ने आणू नये.

अण्णा हजारे हे अत्यंत समंजस व्यक्ती आहेत आणि त्यांनी परिस्थितीचा विचार करूनच पूर्वी आंदोलने मागे घेतली होती. मात्र, आजचा समाज बदलला असून, जे बोलले जाते ते प्रत्यक्षात कृतीत आणावे लागते, त्यामुळे सरकारनेही त्याची पूर्ण तयारी ठेवली पाहिजे, असे ठाम मत माजी केंद्रीय गृहमंत्री शिंदे यांनी व्‍यक्‍त केले.

दुष्काळाचा मास्‍टर प्‍लॅन बनवावा

राज्य सरकार जिल्हानिहाय प्लॅन बनवते, मात्र प्रत्येक जिल्ह्याने तालुकानिहाय प्लॅन बनवून वाड्या-वस्त्यांवर आपले लोक पाठवावेत आणि जिथे समस्या आहे तिथे धान्य, पाणी व आवश्यक रक्कम पोहोच करावी, असे शिंदे म्‍हणाले.

शेतकऱ्यांना आणखी मदत हवी

सरकारने दिलेली पाच हजार रुपयांची मदत पुरेशी आहे की नाही, हा प्रश्न निराळा असला तरी जी मदत दिली ती सध्या तुटपुंजी आहे. मात्र, सरकारने यामध्ये आणखी मदत वाढवावी, अशी अपेक्षा माजी केंद्रीय गृहमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT