सोलापूर

Sujay Phadke: सुजय फडकेवर पोक्सो, विनयभंगाचा गुन्हा दाखल

स्वर्गीय डॉ. शिरीष वळसंगकर यांचे जावई सुजय अभय फडके याच्यावर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो) अंतर्गत तसेच विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : सोलापुरातील प्रसिद्ध न्यूरो फिजिशियन स्वर्गीय डॉ. शिरीष वळसंगकर यांचे जावई सुजय अभय फडके याच्यावर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो) अंतर्गत तसेच विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

जानेवारी ते जून २०२६ दरम्यान आरोपी सुजय फडकेने फिर्यादी पीडिता तसेच त्यांच्या अल्पवयीन मुलीविरुद्ध बळाचा वापर करून त्यांना घरातून येण्या-जाण्यास मज्जाव करणे, त्यांच्या परवानगीशिवाय बेडरूममध्ये सीसीटीव्ही लावणे, घरामध्ये येण्याकरिता असलेली लिफ्ट, दरवाजे बंद करणे, तसेच तिसऱ्या मजल्यावरील घराकडे जाण्यासाठी असलेले दुसऱ्या मजल्यावरील दार बंद करणे, या पीडितेच्या राहत्या घरातील पाणी पुरवठा व विद्युत पुरवठा त्रास देण्याच्या उद्देशाने बंद करणे आदी कृत्य केले.

त्या अनुषंगाने पीडितेने सदर बझार पोलिस स्टेशन येथे रीतसर फिर्याद दिल्याने पोलिसांनी चौकशीअंती सुजय फडकेवर पोक्सो तसेच विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक दिनेश कुलकर्णी करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT