सोलापूर

Solapur News: जागतिक एआय कोर्सेस सोलापूरच्या विद्यार्थ्यांसाठी खुले

कॉप्युक्स टेक्नॉलॉजी ॲनलिटिक्ससोबत करार

पुढारी वृत्तसेवा
दीपक शिराळकर

सोलापूर : शिक्षण आणि नोकरीच्या बदलत्या गरजा ओळखून, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने आपल्या विद्यार्थ्यांना भविष्याच्या तंत्रज्ञानासाठी सज्ज करण्यासाठी एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाच्या कौशल्य विकास केंद्र आणि कॉप्युक्स टेक्नॉलॉजी ॲनलिटिक्स, मुंबई या अग्रगण्य संस्थेमध्ये नुकताच सामंजस्य करार करण्यात आला आहे. यामध्ये जागतिक स्तरावर अत्यंत मागणी असलेले आर्टिफिशियल इंटेलिजन्स सर्टिफिकेट कोर्सेस सोलापूर विद्यापीठातील आणि संलग्न महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसाठी खुले करण्यात आले आहेत.

या करारामुळे विद्यापीठातील आणि संलग्न महाविद्यालयांमधील हजारो विद्यार्थ्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता या उद्योन्मुख क्षेत्रातील अत्यंत मागणी असलेले सर्टिफिकेट कोर्सेस शिकण्याची अमूल्य संधी मिळाली आहे.

या तीन अभ्यासक्रमांचा समावेश

या करारानुसार विद्यापीठातील विद्यार्थ्यांना एआय क्षेत्रातील तीन अत्यंत महत्त्वाचे आणि नोकरी-केंद्रित सर्टिफिकेट कोर्सेस शिकण्याची संधी मिळणार आहे. यामध्ये सर्टिफिकेट कोर्स इन मशीन लर्निंग, सर्टिफिकेट कोर्स इन जनरेटिव्ह एआय आणि सर्टिफिकेट कोर्स इन डीप लर्निंग या अभ्यासक्रमांचा समावेश आहे.

ऑनलाईन र्कोस, नोकरीची संधी

अभ्यासक्रम पूर्णपणे ऑनलाईन पोर्टलवर उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीनुसार रेकॉर्डेड क्लासेस पाहता येतील आणि प्रॅक्टिकल्स करता येतील. ही कॉर्पोरेट कंपनीचे प्रशिक्षण असल्यामुळे, उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आयटी क्षेत्रातप्लेसमेंटची संधी उपलब्ध होणार आहे.

नोकरीसाठी केवळ पारंपरिक ज्ञान पुरेसे नाही. एआय कौशल्यांची जोड आवश्यक आहे. कॉप्युक्स टेक्नॉलॉजीच्या तज्ज्ञांकडून प्रथमच प्रशिक्षण मिळत असल्याने जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या एआय कोर्सेसमध्ये लाभ घ्यावा.
- डॉ. प्रभाकर कोळेकर, कौशल्य विकास केंद्राचे संचालक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT