शेततळ्यात बुडून टेंभुर्णीत विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. File Photo
सोलापूर

सोलापूर : टेंभुर्णीत शेततळ्यात बुडून विद्यार्थ्यांचा मृत्यू

Solapur Crime : औद्योगिक वसाहतीजवळील घटना

पुढारी वृत्तसेवा

टेंभुर्णी : शेततळ्यात बुडून वेदांत सतीस व्हटकर (वय 9, रा. कुर्डुवाडी रोड, टेंभुर्णी) या अल्पवयीन शालेय विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. 26) सकाळी सात ते 7.45 वाजण्याच्या सुमारास घडली. तळ्यात पाणी जास्त असल्याने सांगोला येथील रेस्क्यू टीमला त्याचा मृतदेह दुपारी पाण्याबाहेर काढण्यात यश आले. मोठ्या भावास एकाने बुडता-बुडता थोडक्यात वाचविले.

याबाबत अधिक माहिती अशी की, वेदांत व्हटकर हा मोठा भाऊ आर्यन (वय 13 वर्ष) व त्यांच्या शेजारील एक मुलगा असे तिघेजण बुधवारी सकाळी व्यायाम करण्यासाठी व फिरण्यासाठी टेंभुर्णी औद्योगिक वसाहतीच्या बाजूला गेले होते. तेथे अनंता कुटे यांच्या शेततळ्याजवळ गेल्यानंतर शेततळ्याच्या जवळून जात असताना वेदांत हा पाय घसरून व तोल गेल्याने शेततळ्याच्या पाण्यात पडला. त्यास वाचविण्यासाठी मोठा भाऊ आर्यन याने पाण्यात उडी मारली. मात्र त्यास पोहता येत नसल्याने तोही गटांगळ्या खाऊ लागला. यावेळी तिसर्‍या मुलाने मोठ्याने आरडून आवाज दिल्याने एका बिहारी कर्मचार्‍याने पळत येऊन आर्यन यास वाचविले. मात्र तोपर्यंत वेदांत हा पाण्यात बुडाला होता. तळ्यात 35 ते 40 फूट पाणी असल्याने वेदांतचा शोध घेण्यात अडचण येत असल्याने टेंभुर्णी पोलिसांनी सांगोला येथून रेस्क्यू टीम पाचारण केली. त्यानंतर दुपारी रेस्क्यू टीमने वेदांतंचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. त्याचा मृतदेह पाहून नातेवाईकांनी टाहो फोडला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT