Solapur Municipal Corporation Pudhari Photo
सोलापूर

Solapur Municipal Corporation: ‘स्थायी’मध्ये पाणीपुरवठ्याच्या ६२ लाखाच्या कामाला मंजुरी

सभापती रंजिता चाकोते यांची माहिती

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : महापालिकेच्या स्थायी समिती सभेत पाणीपुरवठ्याच्‍या ६२ लाख आणि अल्पसंख्याक बहुल परिसरातील रस्ते कामाला ३२ लाख अशा ९४ लाखांच्‍या कामाला मंजुरी दिली असल्याची माहिती सभापती रंजिता चाकोते यांनी दिली.

कोंडी एम.बी.आर. येथे पाणी पुरवठ्यामध्ये सुधारणा करण्यासाठी सार्व. आरोग्य अभियंता विभाग कडील पाईपलाईन देखभाल व दुरुस्तीसाठी २६ लाख रुपये काम करणे. बाळे कॉर्नर ब्रीज खालून मुख्य पाणी पुरवठा लाईनवरून १२ इंची जलवाहिनी लक्ष्मी नगर चांदोले घर ते विभुते घरापर्यंत घेणे टाकणे.

अल्पसंख्याक बहुल नागरी क्षेत्रात मुलभूत नागरी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी साईनाथ नगर येथे सलीम पामा घरासमोर रस्ता काँक्रिटीकरण करणे. मंत्री चंडक किल्लेदार मंगल कार्यालय ते एस. बी. पी. अपार्टमेंटपर्यंत व परिसरातील रस्ते करणे. नवी पेठ, रानडे मारुती मंदिराच्या पाठीमागील बाजूस बंद बोळाची जागा सो. म. न. पा. मालकीची आहे. ही बंद बोळातील रस्त्यालगतची जागा भोडतत्‍वावर देण्यास मान्यता देण्यासाठी प्रस्ताव होता. या प्रस्तावित कामामधील पाणी, रस्ते या मूलभूत कामांना मंजुरी देण्यात आली. जागा भाडेकरारचा विषयात निर्णय घेण्याबाबत आयुक्तांना अधिकार दिल्याचेही सभापती चाकोते यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT