pudhari
सोलापूर

ST Bus Pass : विद्यार्थ्यांना शाळेच्या दारात एसटी पास; धावपळ संपली

ग्रामीण विद्यार्थिनींना मोफत पास; मुलांना ६७ टक्के सवलत

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : १५ जूनपासून सुरु होणाऱ्या नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभीच विद्यार्थ्यांसाठी परिवहन महामंडळाने (एसटी) दिलासादायक असा देणारा निर्णय घेतला आहे. यंदापासून विद्यार्थिनींना मोफत व तसेच विद्यार्थ्यांना सवलतीचे एसटी बस पास त्यांच्या शाळा व महाविद्यालयातच उपलब्ध करून दिले जाणार आहेत. विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवासाच्या पाससाठी यापूर्वी धावपळ करावी लागत असे. यावर्षी आगार अथवा बसस्थानकांत विद्यार्थी आणि पालकांना फेऱ्या मारण्याची गरज नाही.

परिवहन महामंडळ आपल्या दारी या विशेष मोहिमे अंतर्गत महामंडळाचे (एसटी) अधिकारी शाळा व महाविद्यालयांना भेटी देऊन तेथेच विद्यार्थ्यांना सवलतीचा तर विद्यार्थिनींना मोफत पास तयार करून देणार आहेत. जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांना याचा सुविधेचा लाभ मिळणार आहे. जिल्ह्यातील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या जवळपास तीन लाखाहून अधिक विद्यार्थ्यांसह औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) विविध तंत्रशिक्षण अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनाही सवलतीच्या दरात प्रवास करत शिकता येणार आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यार्थीनी मोफत बस प्रवास योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना पूर्णतः मोफत प्रवास करून शिक्षण पूर्ण करण्याची सुविधा असणार आहे.

विद्यार्थ्यांना मासिक पासच्या एकूण शुल्कापैकी फक्त ३३ टक्के सवलतची रक्कम भरून पास काढावा लागेल. उर्वरित ६७ टक्के रकमेची सवलत दिली जाते. जि.प. प्राथमिक शाळांची संख्या ही २,७६८ इतकी तर माध्यमिक शाळांची संख्या ही ९८१ आहे. जिल्ह्यात एकूण १३० महाविद्यालये आहेत. याशिवाय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व तांत्रिक महाविद्यालयेही आहेत. या विद्यार्थ्यांना शाळेच्या दारात पास मिळणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT