ST Bus  Pudhari
सोलापूर

ST Bus: लालपरीच्या सहा वर्षांतील अपघातात दोन हजार प्रवाशांचा मृत्यू

15 हजार 767 अपघात; 378 कोटींची लालपरीकडून अपघातग्रस्तांना आर्थिक मदत

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : मागील एप्रिल 2018 ते एप्रिल 2024 या सहा वर्षाच्या काळात परिवहन (एसटी) महामंडळाच्या लालपरीचे 15 हजार 767 अपघात झाले. यामधील अपघातग्रस्तांना नुकसानभरपाई म्हणून महामंडळाकडून 378 कोटी नऊ लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्यात आली आहे. लालपरीच्या अपघातांमध्ये अनेक प्रवासी गंभीर जखमी झालेले आहेत. या अपघातात अनेक प्रवाशांना जीवही गमवावा लागला. महामंडळाच्या आकडेवारीनुसार अपघातांमध्ये 19 हजार 564 जण जखमी झाले. तर 2 हजार चारजणांचा मृत्यू झाला. अपघातात जीव गमावलेल्या मृतांच्या नातेवाइकांना नियमांनुसार आर्थिक मदत देण्यात आली आहे.

वारसदारांना नुकसान भरपाई देणारे महामंडळ

अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या ज्येष्ठ मुलगा किंवा अविवाहित ज्येष्ठ मुलगी यांना नुकसानभरपाई देण्याचे धोरण स्वीकारणारे एसटी महामंडळ हे भारतातील पहिलेच परिवहन महामंडळ आहे.

आर्थिक मदतही...

प्रवासादरम्यान अपघाती घटना घडल्यास जखमी किंवा मृत्यू झालेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत मिळावी. या उद्देशाने महामंडळाकडून विमा योजना राबविली जाते. यामुळे एसटीने प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची हमी मिळते. याच विम्याच्या माध्यमातून अपघातातील जखमींना वा मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत दिली जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT