सोलापूरच्या सिद्धेश्वर गड्डा यात्रेची सांगता 
सोलापूर

Siddheshwar Yatra : सोलापूरच्या सिद्धेश्वर गड्डा यात्रेची सांगता

होम मैदानावरील पाळणे आणि स्टॉल काढण्याची लगबग सुरू

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी सिद्धेश्वर महाराजांच्या कृपाशीर्वादाने संपन्न होणारी, 900 वर्षांची प्रदीर्घ परंपरा लाभलेली ऐतिहासिक गड्डा यात्रा यावर्षी मोठ्या उत्साहात पार पडली.

जानेवारी महिन्यात पंधरा दिवस चाललेल्या या भक्ती आणि आनंदाच्या सोहळ्याची आता अधिकृत सांगता झाली असून, होम मैदानावर सजलेले मनोरंजनाचे विश्व आता गुंडाळले जात आहे. यावर्षी यात्रेला सलग सुट्ट्यांचे पाठबळ मिळाल्याने सोलापूर जिल्ह्यासह शेजारील कर्नाटक व तेलंगणा राज्यातूनही भाविकांचा ओघ वाढला होता. बच्चेकंपनीसाठी आकर्षणाचे केंद्र असलेले गगनचुंबी आकाश पाळणे, कोलंबस आणि ड्रॅगन ट्रेन यांसारख्या खेळांनी मैदानावर चैतन्य निर्माण केले होते.

यंदा प्रथमच सादर झालेला जलपरी शो यात्रेचे मुख्य आकर्षण ठरला. याशिवाय पन्नालाल गाढवाचे खेळ, आकर्षक विद्युत रोषणाई आणि विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सवर खवय्यांनी मोठी गर्दी केली होती. आता यात्रेचा समारोप झाल्याने व्यावसायिकांची परतीची ओढ सुरू झाली आहे. होम मैदानावर उभे असलेले अजस्त्र पाळणे उतरवण्याचे काम मजुरांकडून युद्धपातळीवर सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT