सोलापूर

Solapur News: श्री माढेश्वरी मंदिर परिसरात एक कोटीचे ‘नमो उद्यान’

बालकांपासून ज्येष्ठांसह दिव्यांगांसाठीही विशेष व्यवस्था

पुढारी वृत्तसेवा

माढा : माढा शहराच्या सौंदर्यात आणि वैभवात भर घालणाऱ्या श्री माढेश्वरी मंदिर परिसरातील एक कोटी रुपये खर्चाच्या ‘नमो उद्यानाचे’ भूमिपूजन उत्साहात पार पडले. नगर विकास विभागाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत माढा नगरपंचायत क्षेत्रात उत्कृष्ट व सर्वसोयींयुक्त उद्यान विकसित करण्यासाठी शासनाकडून एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

नमो उद्यानाचे काम लवकरात लवकर आणि उच्च गुणवत्तेने पूर्ण करून ते नागरिकांच्या सेवेत खुले करण्यात येईल, असा विश्वास माढा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा मिनलताई साठे व मुख्याधिकारी नेहा कंठे यांनी व्यक्त केला.या उद्यानात लहान मुलांसाठी खेळणी, जॉगिंग व वॉकिंग ट्रॅक, ओपन जिम, ज्येष्ठ नागरिकांसाठी विश्रांती कक्ष, योग व ध्यानधारणेसाठी जागा आदी सुविधा उपलब्ध होणार आहेत. तसेच दिव्यांग नागरिकांसाठी रॅम्प व रेलिंगची विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे. उद्यानाच्या परिसरात स्थानिक व देशी प्रजातींची झाडे, औषधी वनस्पती आणि फुलबाग यामुळे हिरवाई वाढविण्यात येणार आहे.

भूमिपूजन कार्यक्रमास दादासाहेब साठे, झुंजारनाना भांगे, गुरुराज कानडे, उपनगराध्यक्ष कल्पना जगदाळे, महिला व बालकल्याण समिती सभापती रेश्मा लंकेश्वर, पाणीपुरवठा सभापती निर्मला थोरात, बांधकाम सभापती वंदना लंकेश्वर, नगरसेविका अर्चना कानडे, मोहिनी नेटके, शबाना बागवान, माजी नगरसेविका गीतांजली देशमुख नगरसेवक अजिनाथ माळी, अरुण कदम, नाना साठे, विकास साठे, माजी नगरसेवक चंद्रकांत कांबळे, नितीन साठे, शिवाजी जगदाळे, शिवाजी माने, वेदांत साठे, शाहू चवरे, रमेश थोरात, सुधीर लंकेश्वर, नगर रचनाकार ज्ञानेश्वर भांगिरे, रवींद्र कथले, भिवाजी जगदाळे, विलास जगताप, प्रवीण पवार, बापू कुंभेजकर, संदीप साठे, रविराज जगदाळे, शिवरंग गोटे यांच्यासह माढा नगरपंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT