Solapur Municipal Corporation  (Pudhari File Photo)
सोलापूर

Solapur Municipal Corporation: गाळेधारकांना ५८.८३ लाखांची मिळाली दंडमाफी

भाडे न भरणाऱ्या गाळेधारकांवर कारवाई करत पथकांनी दररोज पाच गाळे सील करण्याचे निर्देश

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : अभय योजनेअंतर्गत थकीत भाडे वसुलीचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण न करणे आणि आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी सोलापूर महानगरपालिकेतील नऊ कर्मचाऱ्यांना प्रत्येकी एक हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

अभय योजनेत ८५५ गाळेधारकांना ५८.८३ लाखांची दंडमाफी करण्यात आली आहे. मनपा गाळे भाडे थकबाकी वसुली मोहीम शनिवार-रविवारीही राहणार आहे. अभय योजनेस १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.भाडे न भरणाऱ्या गाळेधारकांवर कारवाई करत पथकांनी दररोज पाच गाळे सील करण्याचे निर्देश देण्यात आले होते.

मात्र, १८ आणि २० ऑगस्ट रोजी संबंधित पथकांकडून हे उद्दिष्ट पूर्ण झाले नाही. त्यामुळे आयुक्तांच्या आदेशानुसार सहाय्यक आयुक्त विनोद कुलकर्णी यांनी ही कारवाई केली.

८५५ गाळेधारकांना दंडातून मिळाली माफी

१ जुलै २०२६ पासून आतापर्यंत अभय योजनेअंतर्गत ८५५ गाळेधारकांचा ५८ लाख ८३ हजार ४५ रुपयांचा दंड माफ करण्यात आला आहे. मिनी शॉपिंग सेंटरमधील ६५३ गाळ्यांपैकी १२३ गाळेधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या असून, सुमारे ४२ लाख ८६ हजार रुपयांची थकीत रक्कम वसूल करण्यात आली आहे. तसेच १२ लाख रुपयांची दंडमाफी देण्यात आली असून २१ गाळे सील करण्यात आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT