Fraud Case Pudhari
सोलापूर

Solapur Share Market Fraud: शेअरमधील नफ्याचे आमिष दाखवून ४५ लाखांची फसवणूक

सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : शेअर मार्केट आणि आयपीओमध्ये मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत सोलापुरातील एका व्यक्तीची तब्बल ४४ लाख ७८ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी प्रवीण देविदास दासरी (रा. न्यू सुनील नगर) यांचा आरोपीने विश्वास संपादन केला. त्यानंतर ऑफीन अकेड नावाचे बनावट ॲप्लिकेशन तयार करून त्याचा वापर करण्यात आला. व्हॉट्सॲपद्वारे फिर्यादीशी वेळोवेळी संपर्क साधून शेअर मार्केट व आयपीओमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळेल, असे सांगण्यात आले.

फिर्यादीने या ॲप्लिकेशनवर शेअर्स व आयपीओची खरेदी केली. त्यातून मोठा नफा झाल्याचे बनावट चित्र दाखवून आरोपींनी वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे जमा करण्यास सांगितले. त्यानुसार फिर्यादीकडून ऑनलाईन फोन-पे तसेच आरटीजीएसच्या माध्यमातून एकूण ४४ लाख ७८ हजार रुपये भरून घेण्यात आले. परंतु त्‍यानंतर कोणताही परतावा मिळत नसल्याचे कळाल्यावर दासरी यांनी पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणी रुचिका विशॉ (खाते क्र. ६३६६८७२३६०) हिच्‍या विरोधात सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस निरीक्षक ढवळे तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT