Shaktipeeth Highway file photo
सोलापूर

Shaktipeeth Highway: ‘शक्‍तिपीठ’साठी ६२०० हेक्टर जमीन होणार संपादित

मार्च २०२७ पर्यंत मोजणी होणार पूर्ण; चार जिल्ह्यांत भूसंपादनाची प्रक्रिया

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : शक्‍तिपीठ महामार्गासाठी सहा हजार २०० हेक्‍टर जमीन संपादित होणार आहे. यामध्ये पुणे विभागातील चार जिल्‍ह्यातील भूसंपादनाची प्रक्रिया प्रस्‍तावित असून, लवकरच जमिनीची संयुक्त मोजणी होईल. मार्च २०२७ पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन असल्याची माहिती पुणे विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी दिली.

जमीनधारक आणि प्रशासनाच्या उपस्थितीत ही मोजणी करून संपादित होणाऱ्या क्षेत्राची निश्चिती केली जाणार आहे. त्यानंतर भूसंपादनाची पुढील कायदेशीर प्रक्रिया राबविण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

सोलापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या एसआयआरच्या कामाचा आढावा घेण्यासाठी निरीक्षक म्हणून विभागीय आयुक्त तेली-उगले सोलापुरात आल्या होत्या. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाबाबत महत्त्वाची माहिती दिली.

शक्‍तिपीठ मार्गासाठी भूसंपादन टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे. संबंधित जमीन धारकांची माहिती, जमिनीचे क्षेत्रफळ आणि मार्गाची निश्चित आखणी यासंदर्भातील प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष भूसंपादनाला गती देण्यात येणार आहे.

संयुक्त मोजणी, जमिनीची निश्चिती, भूसंपादनाची अधिसूचना आणि त्यानंतरची भरपाई याबाबत जमीनधारकांना प्रशासनाकडून स्पष्ट माहिती दिली जाईल. पारदर्शक राबविण्यावर प्रशासनाचा भर असेल.
- शीतल तेली-उगले, पुणे विभागीय आयुक्त

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT