assault case pudhari photo
सोलापूर

Solapur Crime : अश्लील फोटो व्हायरल करण्याच्या धमकीतून अत्याचार

बार्शी शहर पोलीस ठाण्यात तरुणाविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

बार्शी : येथील २१ वर्षीय तरुणीला प्रेमसंबंधासाठी वारंवार त्रास देऊन, अश्लील व्हिडिओ मागवून ब्लॅकमेल केल्याप्रकरणी आणि कोल्हापूर येथे लॉजवर नेऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात एका तरुणाविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गणेश राजेश अवधुत (वय २१, रा. सुभाषनगर, बार्शी) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ वर्षीय फिर्यादी तरुणीचा मित्र असलेल्या गणेश अवधुत याने फेब्रुवारी २०२४ मध्ये तरुणीकडे प्रेमसंबंधाचा प्रस्ताव ठेवला होता. फिर्यादीने नकार दिल्यानंतरही तो फोन व सोशल मीडिया वरून सतत त्रास देत होता.

आरोपीने तिच्याकडे असलेले जुने फोटो आणि चॅटिंग तिच्या पालकांना पाठवण्याची आणि बदनामी करण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. या धमकीला घाबरून तिला व्हिडिओ पाठवण्यास भाग पाडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तो वारंवार ब्लॅकमेल करत होता. आरोपीने कोल्हापूर येथील तिच्या कॉलेजजवळ येऊन व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. एका लॉजवर नेऊन तिला मारहाण करून जबरदस्तीने अत्याचार केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. घरी सांगितल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली.

यानंतरही त्रास सुरूच राहिल्याने तिने आरोपीशी संपर्क तोडला. त्यानंतर आरोपीने तिच्या वडिलांच्या मोबाईलवर यापूर्वी कॅफेमध्ये काढलेले फोटो पाठवले. त्यानंतर कुटुंबीयांनी विचारणा केल्यावर हा सर्व प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध विनयभंग, धमकी, ब्लॅकमेल आणि अत्याचाराच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT