schools holiday Pudhari
सोलापूर

Solapur schools holiday: जिल्ह्यातील शाळा आज बंद राहणार

शिक्षकांचे आंदोलन; सहभागी झाल्यास वेतन कपात : शिक्षण विभाग

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : टीईटी रद्द करण्यासाठी आज गुरुवारी (दि. ९) पुकारलेल्या शाळा बंद आंदोलनात सोलापूर जिल्ह्यातील शिक्षक व संघटनांनी सहभाग घेतला आहे. त्यामुळे जिल्‍ह्यातील अंदाजे तीन हजार शाळा आज बंद राहण्याची शक्‍यता आहे.

दरम्यान, आंदोलनात सहभागी झालात तर कठोर कारवाई करू, असा पवित्रा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने घेतला आहे. टीईटी रद्द करावी, बीएलओ, एसआयआरची कामे शिक्षकांना देऊ नये, १४ मे २०२६ चे शासनाचे पत्र रद्द करावे, जाचक संच मान्‍यता रद्द करावी, या प्रमुख मागण्यासह इतर मागण्यांसाठी विविध शिक्षक संघटनांनी शाळा बंद आंदोलनाची हाक दिली आहे. शिक्षक संघ (संभाजी गट) वगळता इतर सर्वच संघटनांचा या आंदोलनात समावेश आहे.

एका दिवसाचे वेतन होणार कपात

शाळा बंद ठेवून आंदोलनात सहभागी होणाऱ्या शिक्षकांचे वेतन कपात करण्यात येईल. त्‍यामुळे आंदोलनात सहभागी होऊ नये, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. आवाहनाकडे दुर्लक्ष करून आंदोलनात सहभागी झाल्‍यास एका दिवसाचे वेतन कपात करण्यात येईल, अशी माहितीही शिक्षण विभागाच्या सूत्रांनी दिली.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी मुख्याध्यापकांना शासनाच्या निर्देशानुसार शाळा नियमित सुरू ठेवण्याच्या सूचना दिल्‍या आहेत. तरीही शाळा बंद ठेवल्‍यास शिक्षकांचे वेतन कपात करण्यात येईल.
- कादर शेख, शिक्षणाधिकारी, प्राथमिक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT