सोलापूर

Solapur News: झोक्‍यामुळे शाळेचे प्‍लास्‍टर कोसळले

जि. प. सीईओ कुशल जैन : मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, गटशिक्षणाधिकाऱ्यास नोटीस

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर/अक्‍कलकोट : अक्‍कलकोट तालुक्‍यातील बबलाद गावातील जिल्‍हा परिषदेच्‍या कन्नड शाळेचा प्‍लास्‍टर कोसळून १३ विद्यार्थी आणि दोन शिक्षक जखमी झाले आहेत. विद्यार्थ्यांनी बांधलेल्‍या झोक्‍यामुळे हा प्‍लास्‍टर कोसळला. त्‍यामुळे मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख आणि गटशिक्षणाधिकाऱ्यास नोटिसा दिल्‍याची माहिती जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी दिली.

जिल्‍हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य, सीईओ जैन यांनी बुधवारी (दि.१२) बबलाद येथील शाळेला भेट देऊ प्रत्‍यक्ष पाहणी केली. त्‍यानंतर जिल्‍हा परिषदेत पत्रकार परिषदेत घेऊन माहिती दिली. यावेळी उपाध्यक्ष इंद्रजीत पवार, झेडपी सदस्‍य विकास बुळ्ळा आदी उपस्‍थित होते.

सीईओ जैन म्‍हणाले, जखमी झालेल्‍या विद्यार्थी, शिक्षकांना तत्‍काळ उपचार करण्यात आले आहेत. त्‍यातील ११ विद्यार्थ्यांना किरकोळ जखमा तर दोन विद्यार्थ्यांना जास्‍त जखम झाल्‍या असून, त्‍यांना घरी सोडण्यात आले आहे. प्‍लास्‍टर पडल्‍यामुळे हा अपघात झाला.

मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, गटशिक्षणाधिकाऱ्यांना नोटीस

सीईओ जैन यांनी बबलाद येथील जिल्‍हा परिषद कन्नड शाळेस भेटी देऊन तेथील शाळेची पाहणी केली. त्‍यानंतर त्‍यांनी मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख आणि गटशिक्षणाधिकारी यांना कारणे दाखवा नोटिस बजावून, तत्‍काळ खुलासा देण्याची मागणी केली आहे.

दोन विद्यार्थी हॉस्पिटलमध्येच

बबलाद शाळेत जखमी झालेले सर्व विद्यार्थ्यांना सोडण्यात आल्‍याची माहिती सीईओ जैन यांनी दिली आहे. मात्र, याविषयी माहिती घेतली असता त्‍यातील दोन विद्यार्थी सायंकाळी पाच वाजेपर्यंत अक्‍कलकोट येथील हॉस्पिटलमध्ये ॲडमीट असल्‍याची माहिती समोर आली आहे.

वंचित आघाडीचे अतिरिक्‍त सीईओंना निवेदन

बबलाद येथील शाळेतील छत कोसळून विद्यार्थी, शिक्षक जखमी झाले आहेत. त्‍याची चौकशी करुन संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन वंचित बहुजन आघाडीच्‍या पदाधिकाऱ्यांनी जिल्‍हा परिषदेचे अतिरिक्‍त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर यांना दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT