सोलापूर : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत जिल्हास्तरीय मिनी सरस व रुक्मिणी महोत्सव प्रदर्शनाचे 1 ते 5 मार्च दरम्यान आयोजन करण्यात आले होते. यावेळी झालेल्या उलाढालीची माहिती देण्यास ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालयाने टाळाटाळ केली असून, गतवर्षी 46 लाख रुपयांची उलाढाल झाली होती.
बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंची विक्री प्रदर्शन नॉर्थकोट मैदानावर भरविण्यात आले होते. त्याचा समारोप पार पडला आहे. यावेळी महापालिकेच्या उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक चंद्रशेखर जगताप, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, मुख्य वित्त व लेखा अधिकारी मिनाक्षी वाकडे, जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चवरे, सचिन जाधव, संतोष डोंबे, राहुल जाधव, दयानंद सरवळे, मिनाक्षी मडीवली, अनिता माने उपस्थित होते.
या प्रदर्शनात जिल्ह्यातील 75 तसेच इतर जिल्ह्यातील पाच अशा एकूण 80 बचत गटांच्या समूहांनी सहभाग नोंदविला होता. अनेक महिलांनी या महोत्सवास भेटी दिल्या.