सोलापूर

Solapur News: सोलापूरच्या १,४७८ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेला गती

बैठकीत प्रकल्पाचा अंतिम तांत्रिक आराखडा (टीपीआर), जागतिक बँकेकडून प्रस्तावित कर्ज, निधी नियोजन आणि पुढील प्रशासकीय कार्यवाहीचा सविस्तर आढावा घेण्यात आला

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करून भविष्यातील पाणीटंचाईवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रस्तावित १ हजार ४७८ कोटी रुपयांच्या दीर्घकालीन पाणीपुरवठा योजनेच्या अनुषंगाने मुख्यमंत्री यांचे सल्लागार तथा ‘मित्रा’चे प्रमुख प्रवीणसिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत गुरूवारी (दि.९) आढावा बैठक झाली. बैठकीत प्रकल्पाचा अंतिम तांत्रिक आराखडा (टीपीआर), जागतिक बँकेकडून प्रस्तावित कर्ज, निधी नियोजन आणि पुढील प्रशासकीय कार्यवाहीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

बैठकीस महापौर विनायक कोंड्याल, स्थायी समिती सभापती रंजीता चाकोते, महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रवीणसिंह परदेशी यांनी २० जुलैपूर्वी अंतिम टीपीआर शासनाकडे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. टीपीआर मंजूर झाल्यानंतर नगरसेवकांच्या सहभागातून शहरातील विविध भागांचे सर्वेक्षण पूर्ण करून प्रकल्पाच्या अंमलबजावणीला गती देण्यात येणार आहे.

सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये निविदा प्रक्रिया सुरू करून ती पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरूवात करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. दोन ते अडीच वर्षांत संपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी आवश्यक पूर्वतयारी तातडीने करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT