Solapur Railway File Photo
सोलापूर

Solapur Railway : सोलापूर मार्गावरील रेल्वे गाड्या वळवल्या अन्य मार्गाने

पुणे विभागातील दौंड-मनमाड या दरम्यान रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम सुरू असून या अंतर्गत सोलापूर विभागातून धावणाऱ्या गाड्यांवर परिणाम होणार आहे

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : पुणे विभागातील दौंड-मनमाड या दरम्यान रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम सुरू असून या अंतर्गत सोलापूर विभागातून धावणाऱ्या गाड्यांवर परिणाम होणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने छत्रपती संभाजीनगर - परभणी - लातूर रोड - कुर्डूवाडी - सोलापूर या मार्गाने गाड्या वळवलेल्या आहेत.

दौंड-मनमाड या दरम्यान दुहेरीकरणाचे काम सुरू आहे. गाड्यांचे बदललेले मार्ग खालीलप्रमाणे : गाडी क्रमांक 17323 एसएसएस हुबळी - बनारस एक्स्प्रेस ही गाडी नेहमीच्या मार्गाऐवजी सोलापूर - कुर्डूवाडी - लातूर रोड - छत्रपती संभाजीनगर - मनमाड या मार्गाने धावेल. गाडी क्रमांक 12627 केएसआर बेंगळुरू - नवी दिल्ली कर्नाटक एक्स्प्रेस ही गाडी सोलापूर - कुर्डूवाडी - लातूर रोड - मनमाड मार्गे वळवली आहे.

गाडी क्रमांक 20657 एसएसए हजरत निजामोद्दीन एक्स्प्रेस ही गाडी सोलापूर - कुर्डूवाडी - लातूर रोड - परभणी - छत्रपती संभाजीनगर - मनमाड मार्गे धावेल. गाडी क्रमांक 20658 हजरत निजामुद्दीन - एसएसएस हुबळी एक्स्प्रेस ही गाडी परतीच्या प्रवासात मनमाड - छत्रपती संभाजीनगर - लातूर रोड - कुर्डूवाडी - सोलापूर या बदललेल्या मार्गाने धावेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT