दरोडेखोरांची टोळी जेरबंद 
सोलापूर

Solapur Crime : दरोडेखोरांची टोळी जेरबंद

सातजणांकडून देशी पिस्तूल, काडतुसे, तलवारी, खंजीर जप्त

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : शहरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सातजणांच्या दरोडेखोरांच्या टोळीला गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून पकडले. त्यांच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल, पाच जिवंत राऊंड, दोन तलवारी, तीन खंजीर, दोन कटावणी या हत्‍यारांसह इतर मुद्देमाल हस्‍तगत करण्यात आला. या कारवाईमुळे शहरात मोठा गुन्‍हा टळला. यातील पाच आरोपींवर यापूर्वी गंभीर गुन्‍हे दाखल आहेत अशी माहिती पोलिस आयुक्‍त एम. राजकुमार यांनी दिली.

मनदिपसिंग दयालसिंग संधू (वय ४३), दिलीपसिंग हरिसिंग पवार खालसा (वय ३४), बलप्रीतसिंग सतनामसिंग खैरा (वय २५, तिघे रा. नांदेड), अंकुर रामकुमार प्रतापसिंग (वय २८, रा. बिहार), लक्ष्मण नामदेव जगताप (वय ३५, रा. छत्रपती संभाजीनगर), सुखदेवसिंग बलविंदरसिंग गिल (वय ४२, रा. पंजाब), आणि राजेश कन्नीराम राठोड (वय ४४, रा. मुळेगाव रोड, सोलापूर) अशी त्यांची नावे आहेत. गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखालील सहा. पोलिस निरीक्षक भरत चंदनशिवे व पथक २० रात्रगस्तीवर असता सापळा रचला व या सात जणांना ताब्यात घेतले.

ही कारवाई पोलिस आयुक्त एम. राजकुमार, उपायुक्त डॉ. अश्विनी पाटील, सहा. आयुक्त दिलीप पवार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने यांच्‍या मार्गदर्शनाखाली सहा. पोलिस निरीक्षक भरत चंदनशिवे, निलेश सोनवणे, पोलिस उपनिरीक्षक विजय बनसुडे, मनोज मोरे, अंकुश भोसले, नंदराम गायकवाड, जावीद जमादार, विजय वाळके, तात्‍यासाहेब पाटील, वाजीद पटेल, बापू साठे, योगेश बर्डे, आबाजी सावळे, धीरज सातपुते, अमोल यादव, विठ्ठल यलमार, गणेश शिंदे, अभिजित पवार, शंकर याळगी, सुभाश मुंढे, सैपन सय्यद, वसीम शेख, युवराज गायकवाड, भारत पाटील, विशाल कुलकर्णी यांनी पार पाडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT