सोलापूर : पुढारी वृत्तसेवा सोलापूरमधील सुप्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीश वळसंगकर यांनी स्वतः डोक्यात गोळी झाडून घेत आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी रात्री नऊ ते साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली. शहरात रात्री उशिरा झालेल्या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्र हादरून गेले आहे.
डॉ. वळसंगकर यांनी स्वतःच्या घरात डोक्यात गोळी झाडून घेत आत्महत्या केली. गोळीचा आवाज झाल्याने घरातील इतर सदस्यांनी त्यांच्या रूमकडे धाव घेतली. तात्काळ त्यांना त्यांच्याच वळसंगकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. डॉ. वळसंगकर यांनी पिस्तूलमधून गोळी झाडल्यानंतर डोक्याच्या उजव्या बाजूने गोळी बाहेर गेली. त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना अखेर त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
डॉ. शिरीष वळसंगकर यांनी स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या का? केली याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध झालेली नाही. नेहमीप्रमाणे घरच्यांशी बोलत ते जेवण केले. जेवण झाल्यावर ते स्वतःच्या रूमकडे गेले. काही वेळानंतर त्यांच्या रूममधून गोळी झाडल्याचा आवाज आला. त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न का?केला. काही ताणतणावात होते का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. या घटनेनंतर मात्र वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त (परिमंडळ) विजय कबाडे यांच्यासह पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.