School Teachers Pudhari File Photo
सोलापूर

Solapur News: पाचशे सेवानिवृत्त शिक्षकांना दिलासा

काल्पनिक वेतनवाढीचा लाभ देण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : सेवानिवृत्त शिक्षकांना काल्पनिक वेतनवाढीचा लाभ देऊन त्यानुसार पेन्शन निश्चित करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने दिले आहेत. त्‍यामुळे 501 सेवानिवृत्त शिक्षकांना दिलासा मिळाला आहे.

निवृत्तीपूर्वी सहा महिन्यांपेक्षा अधिक सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना नियम क्रमांक नऊ नुसार जुलै महिन्याची काल्पनिक वेतनवाढ देऊन पेन्शन निश्चित करणे अपेक्षित असतानाही सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभाग, अर्थ विभागाने हा लाभ नाकारला होता. याविरोधात महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद, नगर परिषद व महानगरपालिका सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष शिवानंद भरले, माळशिरस तालुका सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचे अध्यक्ष सुधीर नाचने यांनी रमजान खुतबुद्दीन पठाण यांच्या माध्यमातून उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

याचिकाकर्ते पठाण यांनी ॲड. सतीश राऊत यांच्या मार्फत १४ मार्च २०२६ रोजी याचिका क्रमांक १५६६२ दाखल केली. यावर सुनावणी होऊन न्यायालयाने निर्णय दिला. निवृत्तीपूर्वी सहा महिन्यांहून अधिक सेवा बजावलेल्या शिक्षकांना वार्षिक वेतनवाढीचा लाभ देणे बंधनकारक असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. यासाठी सिद्धेश्वर धसाडे, सुभाष फुलारी, काळप्पा सुतार, रमेश गायकवाड, श्रीमंत गुंड, राजशेखर पाटील आदींनी विशेष प्रयत्न केले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT