सोलापूर

Solapur Crime: रिल स्टार मृत्यूप्रकरणी पतीवर गुन्हा

रोहिणी पाराध्येच्या वडिलांची पोलिसांत फिर्याद; २३ दिवसानंतर गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

मंगळवेढा : तालुक्यातील ब्रह्मपुरी येथील हॉटेल ग्रामपंचायतच्या संचालिका आणि लोकप्रिय रिल स्टार रोहिणी निलेश पाराध्येच्या (वय २५) आत्महत्या प्रकरणाला २३ दिवसांनंतर नवे वळण मिळाले. रोहिणीच्या वडिलांनी तिच्या पतीविरूद्ध पोलिसांत फिर्याद दिली आहे.

मयत रोहिणीचे वडील बाळू गिरजाप्पा शिवशरण (रा. अर्धनारी) यांनी मंगळवेढा पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी व रोहिणीचा पती निलेश विलास पाराध्ये याच्यावर विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नागेश बनकर करत आहेत.

रोहिणीचा मानसिक छळ

दाखल एफआयआरनुसार संशयित निलेश हा रोहिणीला तिच्या मनाविरुद्ध हॉटेलमध्ये काम करण्यास भाग पाडत होता. कौटुंबिक कारणावरून सातत्याने टोमणे मारणे, मारहाण करणे आणि गंभीर परिणामांची धमकी देऊन तिचा शारीरिक व मानसिक छळ करत असल्याचा आरोप रोहिणीच्या वडिलांनी फिर्यादीत केला. नवऱ्याच्या सततच्या जाचाला कंटाळून रोहिणीने दि. २६ मे रोजी दुपारी हॉटेलच्या आवारात गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याचे वडिलांनी तक्रारीत म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT