सोलापूर : गेल्या काही दिवसांपासून शहर-जिल्ह्यातील थंडी हळूहळू ओसरू लागली आहे. मंगळवारी (दि. 4) तापमान 36.9 अंश सेल्सिअसवर गेल्याने सकाळपासूनच उन्हाचे चटके बसत होते.
जानेवारी महिना संपून फेब्रुवारी महिन्यास सुरुवात झाल्यापासून तापमानात सातत्याने वाढ होत आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमान वाढत आहे. मंगळवारी दिवसभर उन्हाचा तडाका जाणवत होता. जानेवारी महिन्यांत शहर-जिल्ह्यात सरासरी तापमान 30 ते 33 अंश सेल्सिअस दरम्यान होते. मात्र, फेब्रुवारी महिना सुरू झाल्यापासून तापमान वाढत आहे. गुरुवारी (दि. 30) तापमान 35 अंश सेल्सिअस, शुक्रवारी (दि. 31) 36 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात तापमान हळूहळू वाढत गेल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.
30 जानेवारी - 35
31 जानेवारी - 36
1फेब्रुवारी - 36.6
2 फेब्रुवारी - 36.4
3 फेब्रुवारी- 36.3
4 फेब्रुवारी- 36.9