दक्षिण सोलापूर : तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने पिकात साठलेले पाणी. Pudhari Photo
सोलापूर

Solapur Rain: दक्षिणमधील गावाचा संपर्क तुटला

सर्वाधिक फताटेवाडीत 169 मिमी पावसाची नोंद

पुढारी वृत्तसेवा

दक्षिण सोलापूर : बुधवारी रात्री आणि गुरुवारी पहाटे पडलेल्या संततधार पावसाने दक्षिण सोलापूर तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला. होटगी सोलापूर प्रमुख मार्गाचा संपर्क तुटल्याने अनेक शाळकरी विद्यार्थी शाळेला, कामगार वर्ग कामावर जाऊ शकले नाहीत. आणि शिक्षकही शाळेवर पोचू शकले नाहीत, त्यामुळे होटगी परिसरातील जवळपास सर्वच शाळा बंद राहिल्या.

रात्री साडेअकराला सुरू झालेला पाऊस सकाळी साडेसहा पर्यंत बरसत होता. या पावसाची नोंद होटगीत 100 मिमी तर फताटेवाडीत 169 मिमी इतकी झाली आहे. मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे होटगी सोलापूर, होटगी, कुंभारी, औज इंगळगी, शिंगडगाव होटगी, मद्रे कुमठे आदी रस्ते पाण्याच्या प्रवाहामुळे पाण्याखाली गेले होते. शेत शिवारात, सखल भागात, मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. खरिपाची पिके पूर्णपणे पाण्याखाली गेली, शेताला तलावाच्या स्वरूप प्राप्त झाले होते.

खरिप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे तेव्हा पंचनामे करून, शेतकर्‍यांना सरसकट भरपाई देण्यात यावी.
-असिम शेख, ग्रामस्थ होटगी.
पावसामुळे झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल जिल्हाधिकार्‍यांकडे पाठवण्यात आला आहे. पुढील सूचनेनुसार पंचनाम्याची कार्यवाही करण्यात येईल. कोणतीही जीवित हानी होऊ नये म्हणून दक्षता घेण्यात आली आहे.
-किरण जमदाडे, सोलापूर.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT