मोहोळ : भारत हवामान खात्याच्या प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांचे कडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार सोलापूर जिल्ह्यामध्ये दिनांक 01 ऑगस्ट ते 05 ऑगस्ट 2025, दरम्यान आकाश अंशता: ढगाळ ते ढगाळ राहील. दिनांक 01 ऑगस्ट ते 05 ऑगस्ट 2025, दरम्यान तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
कमाल तापमान 30.0 अंश सेल्सिअस ते 31.0 अंश सेल्सिअस पर्यंत तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस ते 23 अंश सेल्सिअस पर्यंत राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आद्रता 85 ते 88 टक्के तर दुपारची सापेक्ष आद्रता 69 ते 77 टक्के दरम्यान राहण्याची शक्यता आहे. वार्याचा वेग ताशी 13.0 ते 23.0 किमी पर्यंत राहण्याची शक्यता असल्याची माहिती मोहोळ येथील कृषी विज्ञान केंद्राचे डॉ.सुरज मिसाळ यांनी दिली.
सोलापूर जिल्ह्यात दिनांक 04 आणि 05 ऑगस्ट 2025 रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजासह वादळी वारा (30 ते 40 कि.मी./तास), हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याचा अंदाज जिल्हा कृषी हवामान केंद्र तसेच ग्रामिण कृषि मौसम सेवा,कृषि विज्ञान केंद्र,मोहोळ यांनी दिला आहे.