रेल्वे मेगा ब्लॉकमुळे एसटी बस झाल्या फुल्ल 
सोलापूर

Solapur News : रेल्वे मेगा ब्लॉकमुळे एसटी बस झाल्या फुल्ल

प्रवाशाची भिस्त एसटीवरच; बसस्थानकात प्रवाशांची गर्दी

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : हडपसर ते घोरपडी दरम्यान सुरू असलेल्या रेल्वेच्या तिसऱ्या मार्गिकेच्या कामामुळे रेल्वे ब्लॉक सुरू आहे. यामुळे हुतात्मासह अन्य रेल्वे गाड्या बंद आहेत. यामुळे, शहर जिल्ह्यातील प्रवशांना पुण्याला जाण्यासाठी परिवहन महामंडळाच्या एसटी बसचाच आधार घ्यावा लागत आहे. म्हणूनच, पुणे मार्गावरून धावणाऱ्या नियमित बसेससह अतिरिक्त बसेसही फुल्ल धावत आहेत. पुण्याला जाणारी बस काही मिनिटात भरत आहेत. बसने प्रवास करण्यासाठी येथील मध्यवर्ती बसस्थानकात प्रवाशांकडूम गर्दी झाली आहे.

येत्या ३ व ४ आक्टोबर पर्यंत मध्य रेल्वे विभागाकडून मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. या मेगा ब्लॉकमुळे सोलापूर विभागातील अनेक रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला आहे. या परिणामाचा फटका येथील शहर जिल्ह्यातील प्रवाशांना बसला आहे. नुकतेच गौरी सणासाठी नोकरी व उद्योग व्यवसायानिमित्त अन्य ठिकाणी वास्तव्यास असलेले अनेक जण गावी आलेले आहेत. या सणानंतर परतीच्या प्रवासाच्या दरम्यानच रेल्वेने मेगा ब्लॉक घेतला आहे. यामुळे, या प्रवाशांची गोची झाली आहे. म्हणून, परतीसाठी महामंडळाच्या लालपरीचा आधार घ्यावा लागत आहे. एसटी प्रशासनानेही अतिरिक्त बसेस वाढवलेली आहेत. नियमितसह अतिरिक्त बसेसही सध्या फुल्लच धावत आहेत. येथील मध्यवर्ती बसस्थानकातून कोकणातही काही बसेस गेलेल्या आहेत. यामुळेच येथील बसेसच्या नियोजनावरही परिणाम झालेला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT