Solapur Railway Station 
सोलापूर

Solapur Railway Station : विनापरवाना फेरीवाले, भिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा

रेल्वे विभाग : भीक मागितल्यास दोन हजारांचा दंड; वर्षभर कारावासाचीही तरतूद

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : रेल्वे स्थानक, प्लॅटफॉर्म व रेल्वे कोचमध्ये विनापरवाना वस्तू विक्री करणारे फेरीवाले व भीक मागणाऱ्यांच्या विरोधात रेल्वे प्रशासनाकडून कठोर कारवाई केली जाणार आहे. प्रवाशांना होणारा त्रास, स्थानक परिसरातील अस्वच्छता व अनधिकृत व्यावसायिकांचा वाढत्या वावराला आळा घालण्यासाठी नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर दिला जाणार आहे.

रेल्वेच्या कोच अथवा प्लॅटफॉर्मवर अधिकृत परवानगीशिवाय खाद्यपदार्थ, पाणी किंवा अन्य वस्तूंची विक्री करणे हा नियमभंग ठरतो. तसेच रेल्वे परिसरात भीक मागण्यासही मनाई आहे. अशा प्रकारांमध्ये सहभागी आढळणाऱ्यांवर रेल्वे कायद्यानुसार कारवाई होऊ शकते. यासाठी संबंधित व्यक्तींना दोन हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्याची तरतूद आहे.

विशेष म्हणजे, केवळ दंड आकारून कारवाई थांबणार नसून वारंवार नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना एक वर्षापर्यंत कारावासाची शिक्षाही होऊ शकते. त्यामुळे रेल्वे स्थानकांवर आणि धावत्या गाड्यांमध्ये अनधिकृत विक्री करणारे तसेच भीक मागणाऱ्यांनी सावध राहण्याची गरज आहे.

रेल्वे प्रशासनाकडून तपासणीदरम्यान अशा व्यक्तींवर लक्ष ठेवून नियमानुसार कारवाई केली जाणार आहे. प्रवाशांनीही अनधिकृत फेरीवाल्यांकडून वस्तू खरेदी न करता अशा प्रकारांची माहिती रेल्वे प्रशासनाला द्यावी, असे आवाहन अपेक्षित आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT