सोलापूर : दिवाळी सणामुळे सोलापूर-पुणे-मुंबई या मार्गावर रेल्वे प्रवाशांची मोठी गर्दी आहे. सोलापूरहून सिद्धेश्वर, हुतात्मा व इंद्रायणी एक्स्प्रेससह बहुतांश रेल्वेगाड्यांचे आरक्षण हाऊसफुल्ल असून, रेल्वेच्या प्रवाशांना प्रतीक्षेचे तिकीट काढावे लागत आहे. त्यामुळे प्रवाशांची धावपळ सुरू आहे.
सिद्धेश्वर एक्स्प्रेसच्या स्लीपर व वातानुकूलित डब्यांमध्येही मोठी प्रतीक्षा यादी आहे. काही कोचमधील प्रतीक्षा यादी ही १६० च्या पुढे गेल्याचे चित्र आहे. सोलापूर-पुणे हुतात्मातील एसी चेअर कार व द्वितीय श्रेणीच्या आरक्षित जागा उपलब्ध नसल्याने प्रवाशांना प्रतीक्षा करावी लागत आहे. दरम्यान, पुणे-मुंबई मार्गावरील इंद्रायणी एक्स्प्रेसचे आरक्षणाची स्थिती फुल्लच आहे.
दिवाळीमुळे झालेली प्रवाशांची गर्दी पाहता अनेकांना दक्षिण भारतातून तिकीट काढावे लागत आहे. सोलापूर स्थानकावरून मुंबई व पुणे मार्गासाठी हुतात्मा, इंद्रायणी या दोन्ही गाडीला मोठी गर्दी आहे.
गर्दीमुळे आरक्षणावर ताण.
सिद्धेश्वर एक्स्प्रेसमध्ये स्लीपर आणि एसी डब्यांत मोठी प्रतीक्षा यादी.
हुतात्मा एक्स्प्रेसमध्ये चेअर कार आणि द्वितीय श्रेणीचे आरक्षण फुल्ल.
इंद्रायणी एक्स्प्रेसमध्ये पुणे-मुंबई मार्गावर प्रवाशांची गर्दी.