Accident News Pudhari
सोलापूर

Solapur Accident : सोलापूर-पुणे रोडवर दुचाकीचा भीषण अपघात

पतीचा मृत्यू; पत्नी-मुलगी जखमी

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : सोलापूर-पुणे रोडवरील केगावजवळ नवीन ब्रिज परिसरात शनिवारी (दि. २२) दुपारी तीनच्या सुमारास दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील पतीचा जागीच मृत्यू झाला, तर पत्नी आणि १३ वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली. सोनप्पा पंडित शिरगिरे (वय ४५, रा. लांबोटी, ता. मोहोळ) असे मृताचे नाव आहे. लक्ष्मी शिरगिरे (३५) आणि रुची शिरगिरे (१३) अशी जखमींची नावे आहेत.

शिरगिरे कुटुंबीय दुचाकीवरून लांबोटी येथून सोलापूरच्या दिशेने निघाले होते. केगावजवळ नवीन ब्रिज परिसरात एमजी शोरूमसमोर त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. अपघात नेमका कशामुळे झाला, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे.

अपघाताची माहिती मिळताच १०३३ क्रमांकाची रुग्णवाहिका घटनास्थळी रवाना झाली. चालक अमर जाधव यांनी अवघ्या दहा मिनिटांत घटनास्थळी पोहोचून जखमींना तातडीने सोलापूर सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, सोनप्पा शिरगिरे यांची तपासणी केली असता डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. लक्ष्मी शिरगिरे या गंभीर जखमी असून, रुचीवरही उपचार सुरू आहेत. या घटनेची नोंद सोलापूर सिव्हिल पोलिस चौकीत झाली असून, अधिक तपास पोलिस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT