सोलापूर

Shaktipeeth Highway: शक्‍तिपीठ विरोधात माळशिरस तहसीलसमोर उपोषण

शेतकऱ्यांच्या जमिनीचे सक्तीचे अधिग्रहण तत्काळ थांबवावे; हरकतींचे निराकरण करावे

पुढारी वृत्तसेवा

माळशिरस : शक्‍तिपीठ महामार्ग विरोधात भूसंपादन अधिकारी अकलूज यांच्याकडे हरकती नोंदवल्या. असे असतानासुद्धा कोणतीही दखल न घेता संयुक्त मोजणीच्या तारखा जाहीर केल्याच्या विरोधात बुधवारी माळशिरस तहसील कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे की, शक्तिपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे. शेतकऱ्यांच्या जमिनीचे सक्तीचे अधिग्रहण तत्काळ थांबवले पाहिजे. शेतकऱ्याला देशोधडीला लावणारा महामार्ग थांबला पाहिजे. शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या सर्व हरकतींची योग्य दखल घेऊन त्यावर निर्णय होईपर्यंत कार्यवाही थांबवावी. शेतकऱ्यांच्या इच्छेविरुद्ध संयुक्त मोजणी व जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया राबवू नये. बागायती शेती, पाण्याचे स्त्रोत, घरे व शेतकऱ्यांची उपजीविका उद्ध्वस्त करणारा प्रकल्प थांबवावा. शेतकऱ्यांना भूमीहीन व बेघर करणारी कोणतीही कारवाई करू नये.

अशा मागण्यांचे निवेदन देण्यात आले. हे निवेदन नायब तहसीलदार अमोल कदम यांनी स्वीकारले. यावेळी के. के. पाटील, ॲड. लक्ष्मण मगर, दत्तात्रय मगर, चंद्रकांत मगर, हनुमंत पवार, प्रकाश पवार, उत्तम शेळके, बाळासाहेब मगर, नानासाहेब मगर, उत्तम मगर, पूनम मगर, तानाजी जगदाळे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT