Solapur Municipal Corporation  (Pudhari File Photo)
सोलापूर

Solapur Municipal Corporation: बांधकाम परवान्यास प्रॉपर्टी कार्ड गरजेचे

महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांचे आदेश

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : टी.पी. स्कीम ४ मधील भूखंडासाठी बांधकाम परवानगीचा प्रस्ताव सादर करताना नगर भूमापन विभागाचे प्रॉपर्टी रजिस्टर (पीआर) कार्ड अथवा मिळकतपत्रिका असणे बंधनकारक करण्यात आले आहे. या निर्णयामुळे टी.पी. स्कीम ४ मधील मिळकतदारांच्या अनेक दिवसांपासून प्रलंबित प्रश्नाला मार्ग मिळणार आहे.

टी.पी. स्कीम क्रमांक ४ मधील ७/१२ उताऱ्यांमुळे प्राथमिक व अंतिम रेखांकन, विभागणी-अमलगमेशन तसेच बांधकाम परवानगीच्या प्रक्रियेत निर्माण झालेल्या अडचणी दूर करण्यासाठी महापालिका प्रशासनाने सकारात्मक पाऊल उचलले आहे. महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी क्रेडाई असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन प्रलंबित रेखांकनाच्या प्रश्नावर तोडगा काढण्याचे निर्देश दिले.

१९ ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीस जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख मगर, तसेच नगर भूमापन अधिकारी गजानन पोळ यांच्यासह महापालिका व क्रेडाईचे पदाधिकारी उपस्थित होते. टी.पी. स्कीम ४ मधील एफपी/ओपी वॉर्डनुसार अंतिम झालेल्या ले-आऊटमधील मिळकतपत्रिका नगर भूमापन विभागाकडून देण्यात येणार आहेत. नगर भूमापन विभागाकडून प्राप्त होणाऱ्या मोजणीच्या आधारे नगररचना विभागाने ७/१२ नोंदीनुसार प्राथमिक व अंतिम ले-आऊट तसेच अमलगमेशन अथवा विभागणी प्रस्तावांवर कार्यवाही करावी, असे निर्देश आयुक्तांनी दिले.

यापूर्वीचा निर्णय तसेच २७ नोव्हेंबर २०२५ रोजीचे प्रसिद्धीकरण अधिक्रमित करण्यात आले आहे. बैठकीस उपअधीक्षक सचिन पवार, क्रेडाईचे अध्यक्ष अभिनव साळुंखे, पिंपरकर, केदार बिराजदार, प्रसाद पाटील, सहायक संचालक समीर शितोळे, कार्यकारी अभियंता नीलकंठ मठपती, अभियंता शकील शेख, तुपदोळकर आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT