सोलापूर : सोलापूर शहरवासियांनी भाजपच्या पदरात मतदानरूपी दान दिले आहे. महापालिका कार्यक्षेत्रात 26 प्रभागातून भाजपच्या 87 नगरसेवकांना विजयी केले आहे. एक हाती सत्ता भाजपच्या ताब्यात दिली आहे. आता लोकप्रतिनिधीं, महापौर, पदाधिकाऱ्यांकडून शहरवासियांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. शहरातील रखडलेले प्रकल्प पूर्ण करत नागरिकांना मुलभुत सविधा देण्याचे मोठे आव्हन नूतन महापौरांसमोर असणार आहे.
विधानसभा निवडणुकीत महायुतीला यश मिळाले. सोलापूर जिल्ह्यात भाजप 5 जागा घेऊन मोठा आहे. शहरात भाजपचे तीन आमदार आहेत. महापालिका निवडणुकीत भाजपला ऐतिहासिक बहुमत मिळाले आहे. 87 जागा मिळवत भाजपने आपला झ्रेंडा महापालिकेवर पुन्हा रोवला आहे. 39 वे महापौरपदी विनायक कोंड्याल तर उपमहापौरपदी ज्ञानेश्वरी देवकर विराजमान होतील. पक्षनेता म्हणून ओबीसी समाजाचा चेहरा नरेंद्र काळे यांची निवड झाली आहे.
सभागृहात विरोधीपक्ष नेता नसणार आहे. त्यामुळे उपसुचना नसल्यामुळे भाजप जो ठराव सादर करेल त्याना मान्यता मिळणारच आहे. त्याशिवात केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आहे. जास्तीत जास्त निधी सोलापूर शहरासाठी आणत शहराच्या विकासाठी या नगरसेवकांची कसोटी लागणार आहे.
पालकमंत्री जयकुमार गोरे. आ. विजय देशमुख, सुभाष देशमुख, आ. देवेंद्र कोठे यांच्या माध्यामतुन शासन पातळीवर पाठपुरावा करत शहरात अनेक वर्षांपासून अनेक प्रश्न प्रलंचित आहेत. राज्यशासनाकडून घोषणा झालेले अनेक प्रकल्प अद्याप रखडले आहेत. यासाठी विधानसमेत आवाज उठवत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करत है रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्याचे काम महापौर आणि नूतन पदाधिकाऱ्यांना करावे लागणार आहे.
अन्यथा एक दिवसाआड पाणी पुरवठा म्हणजे मृगजळ
शहराला पाच दिवसांआड तर हद्दवाढ भागाला सात दिवसांआड पाणी येत आहे. उजनी सोलापूर समांतर जलवाहनी सुरू झाली आहे. मात्र औज बंधाऱ्यांतून पाणी उपसा बंद आहे. पाकणी येथे नवीन जलशुध्दीकरण प्रकल्प रखडल्यामुळे उजनी जुनी पाईप लाईन बंद ठेवण्याची नामुष्की प्रशासनावर आली आहे. अद्याप जागेचा पत्ता नाही. यासाठी आमदारांच्या माध्यमातून राज्यशासनाकडून पाठपुरावा करावा लागणार आहे. अन्यथा एक दिवसाआड पाणी पुरवठा मृगजळ ठरण्याची शक्यता आहे.
जुळे सोलापुरातील प्रश्न प्रलंबित
जुळे सोलापुरात प्राधिकरण, बस पोर्ट, टेक्स्टाईल पार्क, हद्दवाठ भागात नाटगृह, आयटी पार्क, 54 मीटर रस्त्यांचे काम पुर्ण नाही, रस्ता, रस्ते, ड्रेनेज, विडी कामगारांच्या आरोग्यासह वेतनाचा, असे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. ते सोडविण्याची मागणी शहरवासियांतून होत आहे.