Solapur News | प्रकल्प बाधित शेतकर्‍याने जीवन संपवले File Photo
सोलापूर

Solapur News | प्रकल्प बाधित शेतकर्‍याने जीवन संपवले

वाढीव मावेजा व कामावर घेतले नसल्याचा कुटुंबियांचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

दक्षिण सोलापूर : फताटेवाडी येथे औष्णिक ऊर्जा प्रकल्प बाधित शेतकरी मिथुन धनु राठोड (वय 40) याने गळफास घेऊन आपली जिवन यात्रा संपवली. फताटेवाडी ग्रामस्थ मृतदेह घेऊन औष्णिक ऊर्जा प्रकल्पाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर ठेवून जोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत इथून मृतदेह हलवणार नाही, अशी भूमिका घेतली.

एमटीपीसीची वाढीव रखमा देण्यास विलंब झाला आहे. एनटीपीसी मध्ये कंत्राटी कामगार म्हणून कामावर घेण्यासाठी राठोड यांच्याकडे दलालाने पैशाची मागणी केली होती. प्रकल्प बाधित शेतकर्‍यांना सोडून बाहेरील लोकांना करावी कामगार म्हणून भरती करण्यात येत असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. मिथुन स्वतः आर्थिक विवंचनेत असल्यामुळे त्याला ते पैसे देऊ शकला नाही. त्यामुळे त्याचे काम न झाल्यामुळे नैराश्यातून त्याने गळफास घेऊन आपली जीवनातला संपली.

घटनास्थळी वळसंग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सनगल्ले, पोलीस उपनिरीक्षक रविराज कांबळे, म्हाळप्पा सुरवसे हे घटनास्थळी दाखल झाले. घटनेची माहिती कळताच राजकीय नेते देखील या ठिकाणी उपस्थित झाले. यामध्ये सुरेश हसापुरे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रामाप्पा चिवडशेट्टी, अभिजित कुलकर्णी, जगन्नाथ गायकवाड, सुभाष पाटोळे, नरसाप्पा दिंडोरे आदींचा समावेश होता. फताटेवाडीसह प्रकल्प बाधित गावातील सरपंच, नागरिक, कामगार, बहुसंख्येने उपस्थित होते.

प्रकल्पातील कोणतेही अधिकारी भेटीसाठी गेटवर येत नसल्याने संतप्त जमावाने औष्णिक ऊर्जा प्रकल्पाच्या प्रवेशद्वारावर दगडफेक केली. संतप्त महिलांनी गेटवर चढून प्रकल्पात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तर रमेश राठोड या तरुणाने अंगावर पेट्रोल ओतून घेतले, तेव्हा लागलीच पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले.

मृतदेह ठेवण्यासाठी ग्रामस्थांनी मागवला फ्रिजर

जोपर्यंत विषयावर तोडगा निघत नाही, तोपर्यंत मृतदेह हलवणार नाही अशी आक्रमक भूमिका ग्रामस्थांनी घेतली होती. यासाठी विलंब लागणार असल्याचे ओळखून ग्रामस्थांनी मृतदेह ठेवण्यासाठी फ्रीजर मागविला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT