सोलापूर : सिद्धेश्वर तलाव  Pudhari File Photo
सोलापूर

Solapur News : जलसंधारणाच्या ५५ प्रकल्पांची होणार चौकशी

बोगस बांधकाम कामगारही अजेंड्यावर; विधीमंडळ अंदाज समितीचे अहवाल सादर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : जिल्ह्यात जलसंधारण कामात झालेल्या चुकीच्या पद्धतीच्या कामांचा चौकशी अहवाल सादर करा, सुमारे ५५ पाझर तलाव, पाणी साठवणूक तलावाची कामे चुकीच्या पद्धतीने झाली आहेत, शिवाय बोगस बांधकाम कामगार अजेंड्यावर असून, त्याचा चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश विधीमंडळ अंदाज समितीने जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

ही समिती गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यातील विविध विकासकामांची तपासणी करत आहे. तिसऱ्या दिवशी शनिवारी जिल्हा नियोजन समिती येथे जिल्हा प्रशासन, महापालिका, कृषी, जलसंधारण, जिल्हा परिषद, पोलिस विभागासह सर्वच शासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली. आ. अर्जुन खोतकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीत आ. कैलास पाटील, आ. सदाभाऊ खोत, आ. हेमंत पाटील यांच्यासह १३ आमदारांचा समावेश आहे.

जिल्ह्यात बोगस बांधकाम म्हणून नोंदणी करून शासकीय योजनेचा लाभ घेतल्याचे आढळून आले आहेत. याप्रकरणी अनेक अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. बोगस लाभार्थ्यांचा शोध घ्या, अशा सक्त सूचना बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्या. दुभत्या जनावरांच्याही कत्तली केल्या जात आहेत, कारवाईकडे दुर्लक्ष केल्यावरून पशुसंवर्धन विभागाला धारेवर धरले. तसेच दारूची अवैध विक्रीवर कारवाई करण्यात होणाऱ्या टाळाटाळीबद्दलही पोलिस विभागाला जाब विचारला.

शहरातील महिला हॉस्पिटल ते सिद्धेश्वर कारखाना मार्गावरून सध्या आवश्यक नसतानाही १६५ कोटी रुपयांतून सुरू असलेल्या सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामांवरून साक्ष नोंदविण्याचे आदेश दिले आहेत. अदिला नदीचे निळ्या आणि लाल रंगाचे सीमांकन निश्चित करण्याचे आदेश जलसंपदा विभागाला दिले आहेत.

मुलांच्या जीवाशी खेळताय का?

शालेय पोषण आहार पुरविताना करारामध्ये वरण भातासाठी चणे डाळ, तांदूळसह अन्य साहित्यही सिलबंदमध्ये खरेदी करण्याची अट असते. परंतु, त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकरणी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांना जाब विचारत खुलासा मागविला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT