Sachin Jadhav BJP Entry
कामती: जकराया साखर कारखान्याचे चेअरमन सचिन जाधव यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. हा प्रवेश सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार राजन पाटील तसेच भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
या कार्यक्रमास भाजपा ग्रामीण जिल्हा सरचिटणीस विकास वाघमारे, भाजपा जिल्हा उपाध्यक्षप्रकाश चौरे, भाजपा युवा मोर्चा माजी अध्यक्ष सुदर्शन यादव, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष (मोहोळ) अंकुश अवताडे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पक्ष प्रवेशावेळी उपस्थित मान्यवरांनी जाधव यांच्या सहकार व सामाजिक क्षेत्रातील कार्याचा उल्लेख करत, त्यांच्या अनुभवाचा लाभ पक्षवाढीसाठी निश्चितच होईल, असा विश्वास व्यक्त केला. सहकार क्षेत्रातील त्यांचा प्रदीर्घ अनुभव मोहोळ तालुक्यात भारतीय जनता पक्ष अधिक बळकट करण्यास उपयुक्त ठरणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या जाहीर प्रवेशामुळे मोहोळ तालुक्यातील राजकीय हालचालींना वेग आला असून, आगामी काळात तालुक्यातील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भारतीय जनता पक्षाच्या वतीने सचिन जाधव यांचे सहर्ष स्वागत करण्यात आले असून, त्यांच्या भावी राजकीय वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.