सोलापूर : भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर पत्रकार परिषदेत बोलताना. 
सोलापूर

Solapur Politics| सोलापूरच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांचे बार!

रोहिणी तडवळकर यांचा माजी मंत्री म्हेत्रे यांना इशारा

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : दिवाळीच्या सणात फटाक्यांची आतषबाजी सुरू असतानाच सोलापूरच्या राजकीय मैदानात मात्र आरोप-प्रत्यारोपांचे बार उडत आहेत. माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना भान ठेवावे, एकीकडे महायुतीत असताना दुसरीकडे अशा शब्दात टीका करणे हे योग्य नाही. त्यामुळे तुम्ही काँग्रेसमध्ये जावा, अशा शब्दात भाजपच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी पत्रकार परिषद घेऊन टीकास्त्र सोडले.

यावेळी महापालिका सभागृह नेते नरेंद्र काळे, महापौर विनायक कोंड्याल उपस्थित होते. भाजप आमदार देवेंद्र कोठे आणि काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्यातील शाब्दिक संघर्षाची चर्चा सुरू असतानाच अक्कलकोटमध्ये माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे आणि भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यात वाक्‌युद्ध रंगले आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी म्हेत्रे यांनी केलेल्या वक्तव्यावरून भाजपने आक्रमक भूमिका घेतली असून, शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी पत्रकार परिषद घेत माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्यावर जोरदार टीका केली.

सोलापूरच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून वैयक्तिक टीका आणि एकेरी भाषेचा वापर केंद्रस्थानी आला आहे. खासदार प्रणिती शिंदे यांच्याविषयी आमदार देवेंद्र कोठे यांनी केलेल्या वक्तव्यावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये संघर्ष निर्माण झाला. काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनीही कोठे यांच्यावर आक्रमक शब्दांत टीका केली. हा वाद मध्यरात्री दोन्ही नेते आमनेसामने येण्यापर्यंत पोहोचला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना मध्यस्थी करावी लागली. त्यानंतर भाजपचे ज्येष्ठ आमदार सुभाष देशमुख यांनीही नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिला होता. हा वाद चर्चेत असतानाच अक्कलकोटमध्ये नवा संघर्ष उफाळून आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT