सोलापूर

Solapur Police : शहर पोलिसांनी शोधले 46 लाखांचे मोबाईल

नागरिकांना 231 मोबाईल परत करणार, पोलिस प्रशासनाची माहिती

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : शहर पोलीसांनी सीईआयआर पोर्टल व तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास करुन सोलापुरातून गहाळ झालेले विविध कंपनीचे सुमारे 46,20,000 रु. चे एकूण 231 मोबाईल हॅन्डसेट हस्तगत केले. या मोबाईल मालकांचा शोध घेऊन ते परत देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.

केंद्र शासनाच्या दुरसंचार विभागाद्वारे गहाळ झालेल्या व चोरीस गेलेल्या मोबाईल हॅन्डसेटची माहिती मिळण्यासंदर्भात सीईआयआर पोर्टल सुरु करण्यात आले आहे. सदरील पोर्टल व तांत्रिक विश्लेषणाद्वारे सोलापूर शहरातून गहाळ झालेल्या मोबाईल हॅन्डसेटची माहिती प्राप्त करुन घेवून त्यांचा शोध घेण्यासाठी शहर पोलीसांची विविध पथके परजिल्ह्यात व परराज्यात पाठविण्यात आली होती.

सदरील तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी सीईआयआर पोर्टल व तांत्रिक विश्लेषणाद्वारे अतिशय कुशलतेने तपास करून गहाळ झालेले विविध कंपनीचे सुमारे 46 लाख 20 हजार रुपयांचे एकूण 231 मोबाईल हॅन्डसेट हस्तगत केले.

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त एम. राज कुमार, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, आश्विनी पाटील तसेच सात पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली महंमद रफिक इनामदार, संतोष पापडे, एकनाथ उबाळे, शंकर भिसे, समाधान मारकड, संतोष वायदंडे, कल्लप्पा देकाणे, खाजप्पा आरेवनवरु, दत्ता मोरे, सुधाकर माने, पंकज घाडगे, शैलेश स्वामी, महेंद्र फुलारी, बाबुराव क्षिरसागर, अयाज बागलकोटे, प्रकाश गायकवाड, अर्जुन गायकवाड, सैफअली मुजावर यांनी पार पाडली.

हे मोबाईल परत देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ज्या नागरीकांचे मोबाईल हरवले आहेत अथवा चोरी झाले आहेत त्यांनी सीईआयआर पोर्टलवर जाऊन माहिती भरावी, असे आवाहन शहर पोलिसांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT