सोलापूर : ड्रग्ज फ्रि कॅम्पस कार्यशाळेमध्ये उपस्‍थित विविध शाळांचे मुख्याध्यापक. 
सोलापूर

Solapur News : पोलिस आयुक्तालयातर्फे अंमली पदार्थमुक्त अभियान

शहरातील विविध शाळांतील ४०० मुख्याध्यापकांची घेतली कार्यशाळा

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : अंमली पदार्थमुक्‍त महाराष्ट्र अभियानाअंतर्गत राज्‍यात ड्रग्ज फ्रि कॅम्‍पस अभियान राबविण्यात येत आहे. त्‍याअनुषंगाने सोलापूर पोलिस आयुक्‍तालयाच्‍या वतीने सोमवारी (दि.१०) नियोजन भवन येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेस शहरातील शाळा महाविद्यालयाचे ४०० मुख्याध्यापक उपस्‍थित होते.

अंमली पदार्थमुक्‍त महाराष्ट्र अभियान अंतर्गत सोलापूर शहर पोलिस आयुक्तालयाच्‍या वतीने महाराष्ट्र अंमली पदार्थमुक्त अभियान व शून्य सहनशिलता धोरणाअंतर्गत 'ड्रग फ्रि कॅम्पस' हा कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. त्‍या अनुषंगाने सोमवारी नियोजन भवन येथे शहरातील शाळा व महाविद्यालयाच्‍या मुख्याध्यापकांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी पोलिस आयुक्‍त एम. राजकुमार, मुक्‍तांगण डेडिकेशनच्‍या उपसंचालिका सोनाळी काळे, सारथी युथ फौंडेशनचे रामचंद्र वाघमारे, डॉ. संतोष कोटी, विद्यानंद स्‍वामी, पोलिस उपायुक्‍त वृष्टी जैन, प्रीतम यावलकर, डॉ. आश्विनी पाटील यांची प्रमुख उपस्‍थिती होती. यावेळी सोलापूर शहरातील शाळा, महाविद्यालय परिसरात अंमली पदार्थाचे सेवन विक्री साठवणूक व प्रसार यांना प्रतिबंध करुन विद्यार्थ्यांना सुरक्षित निरोगी व सकारात्मक वातावरण उपलब्ध करुन देणे, स्वांतत्र्य दिनी प्रार्थना, अंमली पदार्थ प्रतिबंधक समिती स्थापन करणे, सतर्कता, कलंक नव्हे संवदेनशिलता, स्वयंसेवक विद्यार्थी घडवणे, पोलिस समन्वय साधणे याबाबत मान्‍यवरांनी मार्गदर्शन केले. पोलिस आयुक्‍त एम. राजकुमार यांनी अंमली पदार्थ प्रतिबंधित करण्यासाठी कोणत्‍या उपाययोजना करायला हव्‍यात याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक आश्विनी पाटील यांनी केले.

या कार्यक्रमास सहा. पोलिस आयुक्‍त दिलीप पवार, पोलिस निरीक्षक आसिफ राजा शेख, स्नेहा म्हेतर, स्वाती येळे, काकडे, अंजली राठोड, घाडगे, ताजुद्दीन शेख, मलकप्पा बनजगोळ, निलम माळवे, सैफन पटेल, सुजाता यादवाड, कफिल पिरजादे, कविता डांगे, अंबिका सुरवसे, इंदिरा राठोड, शीतल माने, सरस्वती घाडगे, नसिमा शेख, नंदिनी जानकर, निलम कांबळे, दादा गोरे आदी उपस्‍थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT