सराईत गुन्‍हेगाराला केले जेरबंद 
सोलापूर

Solapur News : सराईत गुन्‍हेगाराला केले जेरबंद

२१ लाखांचा मुद्देमाल हस्‍तगत; एमआयडीसी पोलिसांची कामगिरी

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : ट्रान्‍स्‍पोर्टचा माल दुसऱ्या गावात घेऊन जाण्याऐवजी त्‍याची परस्‍पर विल्‍हेवाट लावणाऱ्या सराईत गुन्‍हेगारास एमआयडीसी पोलिसांच्‍या गुन्‍हे प्रकटीकरण पथकाने जेरबंद केले. त्‍याच्‍याकडून २१ लाख १९ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्‍तगत केला. प्रतीक निंबाळकर (वय २६, रा. गोपाळवाडी, ता. दौंड, सध्या रा. बारामती) असे सराईत गुन्‍हेगाराचे नाव आहे. याबाबत पोलिस उपायुक्‍त प्रितम यावलकर यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

फिर्यादी परवेज फेजअहमद मोहोळकर (रा. जुने विडी घरकूल, सोलापूर) यांचा मालवाहतुकीचा व्यवसाय आहे. ३१ जुलै रोजी आरोपीने मालवाहतूक करण्याचे सांगून विश्वास संपादन केला. त्‍यासाठी दहा हजार रुपये भाडेही घेतले. पाच लाख ५४ हजार रुपयांच्‍या पी. व्ही. सी. पॅनल पट्टीखा माल आयशर ट्रकमध्ये भरून तो विजयपूर (कर्नाटक) येथे न पोहोचवता परस्पर अपहार करून फसवणूक केली. याप्रकरणी ३ ऑगस्‍ट रोजी एम. आय. डी. सी. पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. एमआयडीसी पोलिस ठाण्याच्‍या गुन्‍हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक अल्‍ताफ शेख यांनी याचा तपास सुरू केला. त्‍यांच्‍या पथकाने कुशलतेने तपास करुन प्रतिक निंबाळकर याला बारामती येथून ताब्‍यात घेतले. त्‍याने गुन्‍ह्याची कबुली दिली. त्‍याच्‍याकडून सर्व मालासह आयशर टेम्‍पो, दोन मोबाईल असा एकूण २१ लाख १९ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्‍तगत केला. ​त्‍याच्‍या सोबतचा दुसरा आरोपी पंकज पारधे याचा पोलिस शोध घेत आहेत. प्रतीक निंबाळकर हा सराईत गुन्‍हेगार असून त्‍याच्‍यावर या अगोदार दौंड व खोपोली येथे दोन गुन्‍हे दाखल आहेत.

सदरची कारवाई पोलिस आयुक्त एम. राजकुमार, पोलिस उपायुक्त प्रीतम यावलकर, सहा. पोलिस आयुक्त अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक भाऊराव बिराजदार, पोलिस निरीक्षक संगीता पाटील, अल्ताफ शेख, राकेश पाटील, एकनाथ उबाळे, संदीप जावळे, सचिन भांगे, अय्याज बागलकोटे, अमोगसिद्ध निंबाळ, सुहास अर्जुन, अमर शिवशिंगवाले, नागेशसिंह चव्‍हाण, कुमार बोल्‍ली, सकलेन मुकादम, अविनाश डिगोळे, अमोल खरटमल, सचिन लवटे यांनी पार पाडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT