अल्पवयीन मुलीस पळवून नेणारा आरोपी ताब्यात 
सोलापूर

Solapur News : अल्पवयीन मुलीस पळवून नेणारा आरोपी ताब्यात

अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाची कामगिरी

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर ः अल्पवयीन मुलीस आमीष दाखवून पळवून नेणारा संशयीत आणि मुलीस शहर पोलिस दलाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेच्या पोलिसांनी पुणे येथून ताब्यात घेतले. तब्बल सहा महिने हा संशयित अल्पवयीन मुलीसह फरार होता. सच्चुकुमार कृष्णा चंद्रबन्सी असे त्याचे नाव आहे.

सच्चुकुमार चंद्रबन्सी याने एका अल्पवयीन मुलीस आमीष दाखवून पळवून नेले होते. याबाबत ऑगस्ट 2025 मध्ये विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास विजापूर नाका पोलिस करीत होते. मात्र सहा महिने होऊनही आरोपीचा शोध लागत नव्हता. त्यानंतर 2 फेब्रुवारी रोजी हा गुन्हा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाकडे वर्ग करण्यात आला. या पथकाने जलद तपास करीत तपास कामाला वेग दिला. यानंतर सदर आरोपी आणि पीडित मुलगी यांना पुण्यातील चाकण येथून ताब्यात घेतले गेले. त्यानंतर त्यांना विजापूर नाका पोलिसांच्या हवाली करण्यात आले.

सदरची कामगिरी पोलिस आयुक्त एम. राजकुमार, उपायुक्त डॉ. आश्विनी पाटील, सहाय्यक आयुक्त राजन माने, व. पोलिस निरीक्षक धनाजी शिंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक आश्विनी काळे, अलका शहापुरे, महादेव बंडगर, सत्तार पटेल, दादा गोरे यांनी पार पाडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT