Fraud Case Pudhari
सोलापूर

Solapur Fraud : प्‍लॉट खरेदीत तेरा लाखांची फसवणूक

प्‍लॉट खरेदी न देता दोघे पळून गेल्याचा प्रकार

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : प्‍लॉट खरेदी करुन देतो म्‍हणून नोटरी करुन १२ लाख ९५ हजार रुपये घेतले; परंतु प्‍लॉट खरेदी न देता दोघे पळून गेल्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणी सुर्यकांत दिगंबर सुरवसे (रा. जळकोट, ता. तुळजापूर) यांनी फिर्याद दिली आहे.

बंधू बाबू कबाडे व सरस्‍वती बंधु कबाडे (दोघे रा. मुकुंद नगर, सोलापूर) यांनी सुरवसे यांचा विश्वास संपादन केला. बाळे येथील गट नं ८४ मधील एक हजार ६०० चौ. फूटाचा प्‍लॉट नंबर २९ हा खरेदी करुन देतो म्‍हणून नोटरी करुन दिली.

त्‍याबदल्यात १२ लाख ९५ हजार रुपये घेतले. परंतु प्‍लॉटची खरेदी न देता दोघेही पळून गेले. या प्रकरणी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT