सोलापूर तालुका पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी आरोपीला पकडले. यावेळी त्यांच्याकडून पिस्तूल जप्त करण्यात आली.  
सोलापूर

Solapur News : पिस्तूल पुरविणारा आरोपी जेरबंद

आणखी एक पिस्तूल जप्त, यापूर्वी आठ आरोपींना अटक

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : मुळेगाव परिसरात कॅश लुटण्याच्या उद्देशाने ड्रायव्हरवर गोळीबार केल्याप्रकरणी आरोपींना पिस्तूल पुरविणाऱ्या आणखी एका आरोपीला सोलापूर तालुका पोलिसांनी अटक केली. संदेश खंडू कांबळे (वय २६, रा. बामणी, ता. जि. धाराशिव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून आणखी एक पिस्तूल जप्त करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ जुलै रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास अ‍ॅपेक्स स्टील अँड हार्डवेअर कंपनीचा चालक एजाज तांबोळी हा दिवसभराचे कलेक्शन घेऊन कंपनी मालकाच्या घरी जात होते. सोलापूर-हैदराबाद महामार्गालगत पांढऱ्या इर्टिगा कारमधून आलेल्या अज्ञात आरोपींनी त्याला जीवे मारून रोकड लुटण्याच्या उद्देशाने रिव्हॉल्व्हरमधून दोन राऊंड फायर केले होते. यात छर्रा लागून तांबोळी जखमी झाले होते. तपासात यापूर्वी आठ आरोपींना अटक करून एक पिस्तूल, सत्तूर, इर्टिगा कार व दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. पिस्तूल पुरविणाऱ्या कांबळेला १६ सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला २१ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सोमणाथ कदम करीत आहेत.

कारवाईत यांचा होता सहभाग

सदरची कारवाई पोलीस आयुक्त अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक विजय कबाडे, अपर पोलीस अधीक्षक सुरज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे, सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम, पीएसआय महेश घोडके, विवेक सांजेकर, पोलीस हवालदार राहुल महिंद्रकर, शशी कोळेकर, अनंत चमके, महेश कटकदौंड, फिरोज मियावाले, पैगंबर नदाफ फिरोज बारगीर यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT