पिंक ई-रिक्षामुळे महिलांना रोजगार प्राप्तीची संधी 
सोलापूर

Solapur News : पिंक ई-रिक्षामुळे महिलांना रोजगार प्राप्तीची संधी

पाच हजारांत ई-रिक्षाचे होऊ शकता मालक; प्रशिक्षण, परवाना व विम्याची सुविधा देण्याची माहिती

पुढारी वृत्तसेवा

आमसिद्ध व्हनकोरे

सोलापूर : महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी राज्य सरकारच्या पाठिंब्याने एका कंपनीने पिंक ई-रिक्षा योजना जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत फक्त पाच हजाराच्या डाउन पेमेंटमध्ये ही ई-रिक्षा घेता येणार आहे. तसेच शून्य टक्के व्याजदरावर ईएमआयची सुविधा उपलब्ध असून, ३० ईएमआय वेळेवर भरल्यानंतर सहा ईएमआय माफ करण्याची सुविधाही यात देण्यात येणार आहे.

या रिक्षाच्या महिला चालकांना ती चालविण्यासाठी मोफत प्रशिक्षण, लायसन्स व बिल्ला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच याला परमिटचीही गरज नाही. ई-रिक्षासाठी पाच वर्षांची वॉरंटी, मेंटेनन्स व विम्याची सुविधाही देण्यात आले आहे. मेट्रो (मेट्रो), उबेर, ओला आणि रॅपिडो यांच्यासोबत फीडर सेवा करारही करण्यात आला आहे.

या माध्यमातून महिलांना नियमित उत्पन्नाची संधी मिळू शकते. किमान दरमहा ३० हजारांपेक्षा अधिक कमाईचे संधी आहे. योजनेच्या अटी, पात्रता, प्रत्यक्ष कमाई आणि उपलब्ध सुविधा याबाबत नोंदणीपूर्वी अधिकृत कागदपत्रे व कंपनीकडून मिळणारी माहिती तपासणे आवश्यक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT