आकाश अंकुश खुर्द-पाटील याचा संशयास्पद मृतदेह आढळून आला आहे.  Pudhari Photo
सोलापूर

सोलापूर : पिलीव येथील तरुणाचा संशयास्पद मृत्यू; मृतदेहावर लोखंडी सळईचे चटके

Solapur Crime News | माळशिरस-पिलीव रस्त्यावरील घटना

पुढारी वृत्तसेवा

पिलीव, पुढारी वृत्तसेवा : माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील आकाश अंकुश खुर्द-पाटील (वय 32) या तरुणाचा माळशिरस-पिलीव रस्त्यावरील वन विभागाच्या क्षेत्रामध्ये विवस्त्र मृतदेह आढळून आला. त्याच्या शरीरावर लोखंडी सळईने चटके दिल्याचे व्रण आढळून आले आहेत. तोंडातून रक्त आलेले आहे. त्याच्या मृतदेहा शेजारी त्याची मोटरसायकल (MH45Aw 582) आढळून आली आहे. या घटनेमुळे पिलीव परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. (Solapur Crime News)

या घटनेची माहिती मिळताच पिलीव औट पोस्टचे पोलीस हवालदार पंडित मिसळ व हवालदार धनाजी झगडे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. सोलापूर जिल्हा ग्रामीणचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक क्षीरसागर, अकलूज पोलीस उपअधीक्षक नारायण शिरगावकर, पोलीस उपनिरीक्षक संदीप गोसावी यांनी घटनास्थळाची पाहणी करून तपासाच्या सुचना दिल्या.

माळशिरस पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिलीव गावातील एका होतकरू तरुणाचा असा संशयास्पद व विवस्त्र अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT