Cattle Transport file photo
सोलापूर

Solapur Cattle Transport : गोशाळेजवळ जनावरे वाहतूक करणारे पिकअप पकडले

५ जणांविरुद्ध गुन्हा; ७ जनावरे ताब्यात

पुढारी वृत्तसेवा

बार्शी : बार्शी ते आगळगाव रोडकडे जाणाऱ्या रोडवर गोशाळेजवळ गोरक्षकांनी एक पिकअप वाहन अडवले असता, त्यामध्ये ७ जनावरे क्रूरपणे, दाटीवाटीने कोंबून वाहतूक करत असल्याचे आढळून आले. या प्रकरणी बार्शी शहर पोलिसांनी ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पिकअपसह ३ लाख ८४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

विवेक राजेंद्र काटकर (रा. राजा बाजार, छत्रपती संभाजीनगर), नितीन सुभाष केंदळ (रा. राजा बाजार, छत्रपती संभाजीनगर), संग्राम मनोज होलीये (रा. संजयनगर, छत्रपती संभाजीनगर), कुलदीप रत्नलालजी गवळी (रा. खोकरपुरा, छत्रपती संभाजीनगर) व चालक गणेश सचिन नामदे (रा. जुना मोंढा, छत्रपती संभाजीनगर) यांच्यावर गुन्हा दाखल झाला.

पो. कॉ. सचिन नितनात (वय ३६, नेमणूक बार्शी शहर पोलीस ठाणे) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. दि. २२ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री २ च्या सुमारास बार्शी शहरात रात्री गस्त घालत असताना, बार्शी ते आगळगाव रोडवर गोशाळेजवळ गोरक्षकांनी एक पिकअपमध्ये काही जनावरे भरून जात असताना त्यांना रस्त्यामध्ये आडवले आहे. खात्री करून कायदेशीर कारवाई करा, असे पोलिसांना आदेश आले.

त्यानुसार पोलिसांनी तत्काळ गोशाळेजवळ धाव घेतली. त्यावेळी गोरक्षक महेश जाधव व स्वप्निल कारंडे हे एका बोलेरो पिकअप जवळ थांबलेले होते. सदर पिकअपचा क्रमांक एमएच ४७ एएस ८६५० असा दिसून आला. पिकअपच्या मागे जाऊन पाहिले असता, त्यामध्ये एकूण ७ जनावरे भरून त्यांना वेदना होईल अशा स्थितीत, कमी रुंदीच्या जागेत हालचाल करता येणार नाही अशा रीतीने मुसक्या आवळून बांधून वाहतूक करताना आढळून आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT